रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचा मॉडर्न महाविद्यालयासमोर रास्ता रोकोचा इशारा

Share this News:
गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून घेत असलेल्या शुल्काच्या खर्चाबाबत माहीत देत नसून ती दडवण्याचा प्रयत्न करत आहेत. माहिती विचारण्यास गेलेल्या विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात व दबाव टाकून शांत केलं जातं असल्याची माहिती रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे शहर सरचिटणीस सूरज गायकवाड यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, संघटनेतर्फे त्यांना याविषयी जाब विचारण्यात आला असता आम्हालाही उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाकडून अधिक माहिती घेतली असता महाविद्यालयास विविध उपक्रमांसाठी विद्यापीठ वेळोवेळी निधी देत असल्याचे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात महाविद्यालय प्रशासनास निवेदन दिले असून जर महाविद्यालयाने या शुल्काविषयी त्वरित माहीती दिली नाही तर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेतर्फे महाविद्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.