रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पुणे शहर युवक अध्यक्षपदी विशाल रेड्डी यांची नियुक्ती
रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी पुणे शहर युवक अध्यक्षपदी विशाल रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली . या नियुक्तीचे पत्र रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामभाऊ डंबाळे यांनी दिले .
विशाल रेड्डी हे आंबेडकरी चळवळीत गेले अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत . त्यांचा आंबेडकरी चळवळीत कामाचा अनुभव पाहता त्यांची हि नियुक्ती करण्यात आली . आपण या पदाच्या माध्यमातून युवकांची ताकद रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी वाढी साठी काम करणार असल्याचे सांगितले .
त्यांच्या या नियुक्तीचे रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसिम शेख , पुणे शहर संघटक इम्रान शेख , आनंद साठे , महिलाध्यक्षा सविता सिंग आदीं मान्यवर उपस्थित होते .
