वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप
पुणे :
गणेश पेठेतील सिद्धिविनायक महिला बचत गटाच्या वतीने रविवारी वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रविवारी दोन हजार वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला. सिद्धिविनायक महिला बचत गटाच्या अध्यक्ष प्रतिभा प्रमोद शिंदे, डाॅ.पल्लवी शिंदे, डाॅ.राहूल जाधवर यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली. या उपक्रमाचे हे ८ वे वर्ष होते.
