वेद विज्ञान मंडळ पुणे यांचा ‘हिंदु धर्म आणि संस्कृती’या विषयावर 42 वा निबंधोत्सव 

IMG_20180603_225750-1.jpg
Share this News:

पुणे – महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरू डॉ. जयंत बाळाजी आठवले लिखित पारंपरिक भारतीय आचार पध्दती आणि आधुनिक आचार यांची तुलना हा प्रबंध वर्तकाश्रम, पुणे येथे दि 3 जून या दिवशी सादर करण्यात आला. समाजातील प्रत्येकाने सात्त्विकतेचे चयन केल्यास समाजाला, परिणामी सर्व विश्‍वाला लाभ होईल. पूर्वीच्या काळी सर्व ऋषींनी सूक्ष्मस्तरावर अभ्यास करून सर्वाधिक योग्य काय आहे, हे आपल्याला सांगून ठेवले आहे. ते आचरणात आणल्यास सर्व विश्वाचे कल्याण होईल हे प्रयोगाद्वारे मांडण्यात आले. महिलांची केशभूषा आणि अलंकार यांची पारंपरिक आणि आधुनिक पद्धती, काळे कपडे आणि पांढरे कपडे, शाकाहार आणि मांसाहार, सण साजरे करण्याची भारतीय आणि पाश्‍चात्य पद्धत, इ विषयांवरील केलेले संशोधन यावेळी मांडण्यात आले. यामध्ये मानसिक स्तर, सूक्ष्म स्तर आणि वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून काढण्यात आलेले निष्कर्ष आणि त्यांच्यातील साम्य याविषयी माहिती देण्यात आली.

प्रत्येकाने सात्त्विकतेचे चयन केल्यास सर्व विश्‍वाला लाभ ! – डॉ. ज्योती काळे

दि 2 आणि 3 जून या दिवशी ब्रह्मर्षी डॉ. प. वि. वर्तक यांच्या वेद विज्ञान मंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित हिंदु-धर्म आणि संस्कृती या विषयावरील निबंधोत्सवात महर्षी अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने डॉ. ज्योती काळे यांनी हा प्रबंध सादर केला. यंदाचे निबंधोत्सवाचे 42 वे वर्ष होते.पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशन (पी. पी. टी.) च्या माध्यमातून हा प्रबंध सादर करण्यात आला. स्त्रियांच्या केशरचने संदर्भात केस मोकळे सोडणे आणि अंबाडा घालणे, याचा स्त्रीच्या मानसिक स्थितीवर होणारा परिणाम आणि आध्यात्मिक स्तरावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यात आला. यात साधना करणाऱ्या 25 स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी मानसिक आणि आध्यात्मिक या दोन्ही स्तरांवरील परिणामात साधर्म्य आढळले.
दुसऱ्या एका प्रयोगात गळ्यातील सोन्याच्या हाराची (नेकलेस) पारंपरिक आणि आधुनिक नक्षी याचा पॉलिकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स टेकनोलॉजी (पिप) या उपकरणाच्या साहाय्याने अभ्यास केला. त्यात पारंपारिक नक्षी अधिक सात्विक असल्याचे स्पष्ट झाले. तर तिसऱ्या प्रयोगात शाकाहार आणि मांसाहार करण्यापूर्वीचे आणि नंतरचे व्यक्तीचे ऊर्जाक्षेत्र (ऑरा) यू टी स्कॅनरच्या साहाय्याने मापण्यात आले. यू टी स्कॅनर हे उपकरण भूतपूर्व अणू संशोधक डॉ मन्नन मूर्ती यांनी एखाद्या सजीव किंवा निर्जीव वस्तूचे उर्जाक्षेत्र मोजण्यासाठी विकसित केले आहे(. त्यानुसार मांसाहार केल्यानंतर व्यक्तीचे ऊर्जाक्षेत्र (ऑरा) कमी झाले आणि 2 दिवसानीही ते मूळ स्थितीत आले नसल्याचे दिसून आले. या उलट शाकाहार केल्यानंतर ऊर्जाक्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून आले. काळे कपडे घालणे याला आजकाल प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. परंतु सूक्ष्म परिक्षणाद्वारे पांढरे आणि फिकट रंगाचे कपडे सात्त्विक असल्याचे सिद्ध झाले. तसेच सण साजरे करण्याची भारतीय आणि पाश्‍चात्य पद्धत, ‘उदा- दिवाळी आणि हॅलोविन, तसेच ३१ डिसेंबर आणि गुढी पाडवा यांचा तुलनात्मक अभ्यासही मांडण्यात आला. यावरून पारंपरिक कृती आणि त्यामागील शास्त्रीय कारण मीमांसा लक्षात येते. या सर्व गोष्टींचे सूक्ष्म परिक्षणही करण्यात आले.(टीप) सूक्ष्म परिक्षण म्हणजे साधनेने ज्यांना मन आणि बुद्धी यांच्याही पलीकडील स्पंदने जाणवतात. ही प्रक्रिया त्यांनी चित्ररूपात रेखाटली आहे.

परात्पर गुरु डॉ.जयंत आठवले यांनी केलेल्या व्यापक कार्याविषयी वेद विज्ञान मंडळाकडून गौरवोद्गार!

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या कार्याविषयीपरात्पर गुरु डॉ. आठवले अध्यात्मिक दृष्ट्या तर महान आहेतच, पण ते करत असलेल्या कार्यासाठी त्यांनी तन-मन-धनाचा त्याग करून या कार्यात सहभागी होणारे सहस्रो साधक सिद्ध केले, हे त्यांचे मोठे योगदान आहे असे गौरवोद्गार वेद विज्ञान मंडळाचे श्री.प्रवीण जाधव यांनी प्रास्ताविक मध्ये मांडले.

दि 2 जून या दिवशी दीपप्रज्वलन आणि निबंध स्मरणिकेच्या प्रकाशनाने निबंधोत्सवाला प्रारंभ झाला. डॉ. प. वि. वर्तक यांनी अध्यक्ष स्थानी असलेल्या श्री.चारुदत्त आफळे यांचा सत्कार केला. मनाचा आणि चारित्र्याचा विकास करणारेच खरे शिक्षण आहे. प्रत्येकाला धर्म कळला की सर्व गोष्टी सोप्या होतात. परंतु हिंदु धर्म प्रचारकांकडून अपेक्षित असा सखोल अभ्यास होत नाही. श्री.चारुदत्त आफळे यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनातून हे सांगितले.

दोन दिवस चाललेल्या या चर्चासत्रात 35 हून अधिक निबंध सादर करण्यात आले. उपस्थित जिज्ञासूनी शंकांचे निरसनही करून घेतले.

प्रबंध सादर केल्यानंतर महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरू डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना वेद विज्ञान मंडळाकडून प्रमाणपत्र देण्यात आले.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय : 30 वर्षांच्या आध्यात्मिक संशोधनानंतर याची स्थापना करण्यात आली आहे. येथे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या योग्य आणि अयोग्य गोष्टी दाखवून दिल्या जातात, सनातन संस्कृतीचे महत्त्व सांगितले जाते, तसेच सूक्ष्म जगताचा मानवी जीवनावर होणार्‍या परिणामाबाबत संशोधन करण्यावर भर दिला जातो. आता पर्यंत विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु(डॉ.) आठवले यांनी संकलित 303 पेक्षा अधिक ग्रंथ 16 भाषांत प्रकाशित केले आहेत. 13 सहस्र. विषयांवर 8 सहस्रहून अधिक ग्रंथ होतील, एवढे लिखाण प्रकाशित होण्याच्या प्रतीक्षेत आहे