शंभरवेळा  रक्तदान शिबिरे घेणाऱ्यां संजय बालगुडे यांचा रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने  स्मृतिचिन्ह सन्मानित

Share this News:
पुणे शहरात एका महिन्यात शंभर भव्य रक्तदान शिबिरे यशस्वी करणाऱ्या संजय बालगुडे यांचा स्मृतिचिन्ह देउन रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले . इंदिरा गांधी व वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे शहरात संजय बालगुडे यांनी शंभर ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केले .

स्वारगेटमधील खडकमाळआळी येथे झालेल्या कार्यक्रमास कार्यक्रमास समीर रूपदे , अलोक पैदरकर , अनुराज सोनवणे ,आदित्य हिवाळे , राहुल भिंगारे ,राहुल कोटला , प्रमिला जंगम , वंदना जगताप व अन्य मान्यवर उपस्थित होते . यावेळी रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांनी सांगितले कि , एका महिन्यात शंभर ठिकाणी रक्तदान शिबिरे घ्यायची म्हणजे हे खूप मोठे कार्य आहे . अशा कार्यामुळे देशाचा सामाजिक विकाशू शकतो . त्यासाठी रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्ट काम करते . या ट्रस्टमुळे एक रक्ताचे कुटुंब तयार झाले आहे . आम्ही एका पुष्पहाराप्रमाणे ओवलो गेलो आहे , त्या पुष्पहाराचा सुगंध या समाजासाठी दरवळत आहे . त्यामुळे ट्रस्टच्यवतीने आज संजय बालगुडे यांचा सन्मान करीत आहोत . रक्त वाहायला ताकद लागत नाही मात्र रक्तदान शिबीर घ्यायला खूप कष्ट लागतात असे सांगून त्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले .

यावेळी सत्काराला उत्तर देताना संजय बालगुडे यांनी सांगितले कि , सन १९८६ पासून आपण रक्तदानाचे कार्य करत आहोत . या रक्तदान शिबिरांमधून कार्यकर्त्यांना एक प्रकारची स्फुर्ती मिळते , आणि त्यातूनच तो कार्यकर्ता घडतो . त्यासाठी आपल्याला या समाजासाठी काही तरी करण्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे तेव्हा आपण या समाजासाठी काही चांगले काम करू शकतो . या शंभर शिबिरामध्ये महाविद्यालयीन युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला . तसेच कसबा पेठमधील रक्तदान शिबिरात तर तीन मूकबधिर युवकांनी रक्तदान केले . आज पुणे शहरात २९ रक्तपेढ्या आहेत आणि दिवसाला शहरात ८०० हुन जास्त रक्ताच्या पिशव्यांची आवश्यकता असते त्यामुळे पुणे शहरात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे .

रक्ताचे नाते चॅरिटेबल ट्रस्टचे ४०००० जास्त रक्तदाते आहेत . असे राम बांगड यांनी सांगितले .