सोनेरी महाराष्ट्र तर्फे स्व. रसिकलाल धारीवाल यांना मरणोपरांत जीवनगौरव पुरस्कार
पुणे (प्रतिनिधी) : जैन समाजाचे दानशूर,सामाजिक,धार्मिक, औद्योगिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या स्व.रसिकलाल धारीवाल यांना सोनेरी महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार 2018 अंतर्गत मरणोपरांत जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. सोनेरी महाराष्ट्र यांच्या वतीने दिली जाणारा हा राष्ट्रीय पुरस्कार उद्योजक कृष्णकुमार गोयल, उद्योजक किशोर खाबिया,हुकमीचंद चोरडिया, विश्वसुंदरी ईशा अग्रवाल, संपादक राजेश अग्रवाल,डॉ. ऊषा खाबिया यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आप-आपल्या क्षेत्रात उल्लेख्नीय कार्य करणार्यांचा सम्मान सोनेरी महाराष्ट्र वृत्तपत्र द्वारे नुकताच अण्णाभाऊ साठे सभागृह मध्ये संपन्न झाला. सुहाना मसाले चे संचालक विशाल चोरडिया, गोयल गंगा गु्रपचे संचालक अमित गोयल यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र, बेंजर पेंट चे प्रदिप अग्रवाल, बुधानी वेफर्स चे अरविंद बुधानी, सज्जनकुमार तुलस्यान, प्रेमचंद मित्तल, नितिन अग्रवाल, शुभांगी गोळे, प्रमोद ओसवाल यांना टाटा बिरला उद्योगरत्न, विश्वसुंदरी व अभिनेत्री ईशा अग्रवाल यांना राइजिंग स्टार, विनोद सांकला , मिसेस महाराष्ट्र श्रेया तुपे, संदीप गादिया यांना युवा समाज रत्न, खेळाडू कुमारी मेघा अग्रवाल, उमेश मांडोत, संजय कांबळे यांना युवा रत्न, मंजीत सिंह विरदी, जगदीश अग्रवाल, ओम सिंह भाटी, जयप्रकाश पुरोहित, देवीचंद अग्रवाल, डॉ.राजेंद्र अग्रवाल, सुमन अग्रवाल, मोहन मांडोत जैन, डॉ. संतोष अग्रवाल, एड.महेश अग्रवाल, एड.आनंदप्रकाश अग्रवाल, भीमसेन अग्रवाल यांना समाजभूषण, जी.जी.इंटरनेशनल स्कुल ला बेस्ट स्कुल ऑॅफ पिंपरी-चिंचवड, ज्योतिषी निरंजन मित्तल यांना अॅक्सीलेंट अस्ट्रोलॉजर, राजेंद्र सरग यांना कार्टूनिस्ट ऑफ द ईयर-2017, माईचंद गुप्ता व रामपाल तंवर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
