‘सोलापूर सार्थक सोहळ्या’ च्या निमित्ताने जिल्ह्याची वैशिष्ठ्ये पाहून पुणेकर भारावले

Share this News:

पुणे, दि. ४ फेब्रुवारी : सोलापूरचे ग्रामदैवत श्री.सिध्दरामेश्वर यांचा पालखी सोहळा पुणेकर रसिकप्रेक्षकांनी अनुभवला. सोलापूर सार्थक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित पंचरंग या सांस्कृतिक कार्यक्रमात श्री.सिद्धेश्वर पालखी सोहळा प्रेक्षकांनी अनुभवला. राजशेखर पंचे आणि त्यांच्या सहका-यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध देवस्थानांची महती पंचरंग या कार्यक्रमाद्वारे सादर केली.

सोलापूरची ओळख सांगणाऱ्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी पाहता येण्यासाठी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे सोलापूर सार्थक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री मा. ना. श्री. सुभाष देशमुखसाहेब, स्वागताध्यक्ष प्रदिप नागणे उपस्थित होते. सोहळ्याचे आयोजन लक्ष्मीकांत गुंड यांनी केले होते.

सोलापूरची खाद्य संस्कृती, वस्त्रोद्योग, बांधकाम,कला, साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्राचा संगम घडवून आणणारा सोलापूर सार्थक सोहळ्याचा दुस-या दिवशीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात पंचरंग कार्यक्रम सादर करण्यात आला. देशातील दक्षिणेतली काशी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी माता,अक्कलकोट स्वामी समर्थ, नीरा नृसिंगपूर येथे विष्णूचे सहावे अवतार नृसिंह, बार्शीचे भगवंत मंदिर, मार्डीचे यमाई मंदिर तसेच संतांची पावनभूमी म्हणून ओळखले जाणारे मंगळवेढा हि सर्व देवतांची गावे सोलापूर जिल्ह्यातीलच आहे. या सर्व देवदेवतांचा जागर पंचरंगकार्यक्रमातून करण्यात आला.