स्मिता शेवाळेला मिळाली ब्लू स्टिक!

Share this News:

प्रत्येक स्त्री कलाकाराला पुनरागमन करणे हे थोडे अवघड जाते, रसिक प्रेक्षक यांच्या समोर पुन्हा येणे आणि त्यांनी स्वीकारणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. कारण शेवटी कलाकारांनी केलेल्या कामाच्या यशाची पावती ही प्रेक्षकच देत असतात. त्यामुळे प्रेक्षक आहेत म्हणून कलाकार आहेत. कलाकारांच्या कामाचे कौतुक करणे, त्यांना प्रोत्साहन देणे यासाठी चाहतावर्ग असला की, कलाकारदेखील आत्मविश्वासाने काम करून यशाच्या मार्गाने वाटचाल करत असतात. असाच चाहतावर्ग सध्या अभिनेत्री स्मिता शेवाळे ला भरभरून प्रेम देत असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. होय, बऱ्याच कालावधीनंतर स्मिता “कनिका” या चित्रपटामार्फत चित्रपट श्रुष्टीत पुनरागमन करते आहे, त्यामुळे ती सध्या अतिशय आनंदात आहेच यासोबत त्यात आणखी भर पडली आहे ती म्हणजे स्मिताला फेसबुक पेज ला ब्लू स्टिक मिळाली आहे. त्यामुळे सध्या स्मिता भलतीच खुश आहे. आपला हा चाहतावर्ग पाहता तिने सोशल मीडियावर सर्व चाहत्यांचे मनापासून आभार मानले.

त्याचबरोबर तिने  तिच्या टेक्निकल टीमचेही कौतुक केले आहे. स्मिताला ब्लू स्टिक मिळाल्याने त्याच्या चाहत्यांना प्रचंड आनंद झाला असल्याचे सोशल मीडियावरील शुभेच्छांवरून दिसत आहे.