४७ वर्षीय महिलेची नवीन तंत्रज्ञानाद्वारे पाठीच्या कण्याची शास्त्रक्रिया यशस्वी

Share this News:

अपघातात जखमी झालेल्यामुळे 47 वर्षांच्या एका महिलेला पाठीचे दुखणे, दोन्ही पायाचे दुखणे जास्त झाले आणि अपघातानंतर चालण्यास असमर्थता होऊ लागली. या वेळी त्यांनी औंध मधील साईश्री हॉस्पिटल मध्ये पक्युटेनिअस पेडिकल फिक्सएशन सिस्टिम तंत्रज्ञानाद्वारे पाठीच्या कण्याची शास्त्रक्रिया करून घेतली.या शस्त्रक्रियेत शरीरातील रक्त स्त्राव हा कमी प्रमाणात होतो.

अपघातानंतर रुग्णाच्या जखम झालेल्या भागाचा एक्स-रे व एमआरआय काढण्यात आला, या तून असे आढळून आले की लुम्बार व्हर्टेब्राला दुखापत झालीये व पाठीच्या कण्याचे एक हाड दबले गेले आहे. यासाठी यावर तात्काळ लक्ष देणे आणि व पाठीच्या कण्यावरील दबाव काढून टाकणे आवश्यक होते. या रुग्णास आधीपासून हृदयाचा विकास असल्यामुळे शस्त्रक्रिये दरम्यान भूल देणे अशक्य होते.यामुळे तज्ञ डॉक्टराच्या टीम ने पक्युटेनिअस पेडिकल फिक्सएशन सिस्टिम चा वापर करण्याचा निर्णय घेतला. हे तंत्र सुरक्षित आहे कारण यात डॉक्टरांना फ्रॅक्चर्ड व्हर्टीब्रा उघडण्याची आवश्यकता नसते. या शास्त्रक्रियेत लाईव एक्स-रे चा वापर करून दोन स्क्रू व्हर्टीब्राच्या वर व दोन स्क्रू व्हर्टीब्राच्या खाली चीर पडलेल्या हाडा जवळ बसवले जातात.या शास्त्रक्रियेत कमी प्रमाणात भूल देऊन अगदी थोड्या वेळात शस्त्रकीया पार पडली जाते. शस्त्रकीया झाल्या नंतर पुढील ४८ तासात रुग्ण घरी जाऊ शकतो व तो दिवसातच हालचाल हि करू शकतो.

“लुब्रा आणि वक्षस्थळाच्या मणक्याच्या विकारांवर उपचार करताना कमीत कमी रक्त स्त्राव व्हावा म्हणून पक्युटेनिअस पेडिकल फिक्सएशन हि पद्धत आजच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे.तसेच हि पद्धत क्वचितच मानेच्या मणक्याच्या उपचारासाठी वापरली जाते.कारण मानेच्या मणक्याचा आकार हा लहान असतो.” असे आर्थोस्कोपिक सर्जन डॉ.नीरज अडकर म्हणाले.

या पद्धतीच्या शस्त्रक्रिये चे अनेक फायदे आहेत जसे कि शस्त्रक्रिया करताना त्वचेवर मोठी चीर होत नाही, कॉस्मेटिक उपचार, जास्त काळ दवाखान्यात थांबायची गरज नाही आणि २४ तासात रुग्ण आधाराच्या सहायाने चालू लागतो.