आझम कॅम्पसच्या शिवजयंती अभिवादन मिरवणूकित १० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

बुधवार, दि. १९  फेब्रुवारी २०२०  रोजी सकाळी साडे आठ वाजता संस्थेचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीचे नेतृत्व संस्थेचे सचिव लतिफ मगदूम यांनी केले. पुण्यातील अल्पसंख्य, बहुजन समाजातील दहा हजार  विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली ही सर्वात मोठी  शिवजयंतीदिनाची  अभिवादन मिरवणूक ठरली .मिरवणुकीचे हे १८ वे वर्ष होते.
 आझम कॅम्पस ते लाल महाल असा या मिरवणुकीचा मार्ग होता.  पूना कॉलेज, गोल्डन ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिट्युट, जूना मोटर स्टँड, पद्मजी पोलिस चौकी, क्वार्टर गेट, संत नरपतगीरी चौक, नाना चावडी चौक, अरुणा चौक, अल्पना टॉकीज, डुल्या मारूती चौक, तांबोळी मशीद, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके चौक मार्गे लाल महाल येथे मिरवणुकीची सांगता झाली. मिरवणूकीत आझम कॅम्पस परिवारातील शैक्षणिक संस्थांचे सर्व प्राचार्य, पदाधिकारी, कर्मचारी, दरबार ब्रास बॅण्डची दोन पथके, ढोल-ताशांचे पथक, तुतारी, नगारे,सनई चौघडा  देखील सहभागी झाले.’सर्व धर्माचे प्रतीक शिवाजी महाराज ‘,’रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज ‘,’शेतकऱ्यांचे कैवारी राजे शिवाजी महाराज ‘ असे फलक विद्यार्थ्यांनी हातात घेतले होते.
 ‘आधी लगीन कोंढाण्याचे’  हा नरवीर तानाजी  मालुसरे यांच्या जीवनावर  आधारित ‘ जिवंत देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला. तसेच , छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी रथातून सहभागी झाले.शाहिद इनामदार ,मुनव्वर शेख,अब्दुल वहाब,वाहिद बियाबानी ,सिकंदर पटेल ,शाहिद मुनीर शेख,डॉ शैला बूटवाला,डॉ किरण भिसे,डॉ व्ही एन जगताप ,रबाब खान,मुमताज सय्यद,परवीन शेख,गफार सय्यद,गुलझार शेख,डॉ इब्राहिम जहागीरदार,नूरजहाँ शेख,प्रा. अनिता बेलापूरकर,डॉ. अनिता फ्रान्झ,प्रा. हेमा जैन,शिक्षक ,पालक,कर्मचारी मोठ्या संख्यने सहभागी झाले .
दरवर्षी संस्थेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महंमद पैगंबर यांना अभिवादन करण्यासाठी भव्य मिरवणुका काढल्या जातात, अशी माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.