अप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांचा सन्मान

SUshma chavan
Share this News:

पुणे, 16/09/2020: कर्तव्य फाउंडेशनतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अप्पर पोलीस अधिक्षक सुषमा चव्हाण यांना “राष्ट्रपती पोलीस पदक” जाहीर झाल्याबद्दल त्यांना कर्तव्य सेवा सन्मान देऊन गौरविण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे व कार्याध्यक्ष अशोक देशमुख यांच्या हस्ते चव्हाण मँडम यांना सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. यावेळी विस्पी चिंधी व मोहसीन शेख उपस्थित होते.

चव्हाण मँडम यांना पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे, यापूर्वी २०१० मध्येही त्यांना हे पदक जाहीर झाले होते. यापूर्वी त्यांनी लष्कर,डेक्कन, गुन्हे शाखा व सायबर सेल याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदी व राज्य गुप्तवार्ता विभाग याठिकाणी पोलीस उपअधिक्षक पदी कर्तव्य निभावले आहे. फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी त्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाल्याबद्दल यावेळी त्यांचे अभिनंदन केले व त्यांना पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.