रमजानमधील दर्जेदार जेवणासाठी मशालीमारफची ख्याती

Share this News:
खास पदार्थांवर 20 टक्के सूट देणारे एकमेव हॉटेल
पुणे (प्रतिनिधी) : पुणे कॅम्पमधील मशालीमार केटरर्सफया शेख नुसरत उस्मानयांनी चालविलेल्या हॉटेलने मांसाहारी पदार्थांच्या बाबतीत केवळ पुण्यातच नव्हे तर जिल्ह्यात ख्याती मिळविली आहे. या व्यवसायात केवळ दहा वर्षांच्या आत शालीमार केटरर्सने पन्नास व्यक्तींपासून 5000 ग्राहकांना एकाच वेळेस जेवण पुरविण्याची क्षमता प्राप्त केली आहे.
विवाह समारंभ, कौटुंबिक व वैयक्तिक भेटीगाठी, औपचारिक व अनौपचारिक पार्टीज्, वाढदिवसाची पार्टी आणि सामाजिक कार्य किंवा शैक्षणिक परिषदा अशा ठिकाणी ही केटरिंग सर्व्हिस सेवा पुरवते. आज या समुहात 30-40 कर्मचारी असून त्या खेरीज 15 जण आमच्या कुटुंबातीलच आहेत, असे नुसरत शेख यांनी सांगितले.
परवडणारी व किफायती किंमत असल्यामुळे सामान्य व्यक्तीलाही या हॉटेलमध्ये जेवताना किंवा केटरिंगची सेवा घेताना फारसा विचार करावा लागत नाही. हेच नुसरत भाई उस्मान शेख यांच्या मते त्यांची केटरिंग सेवा लोकप्रिय होण्याचे कारण होय.
मोठ्या प्रमाणावर जेवण व अन्य अन्न खाद्य पदार्थ देत असलो तरी आम्ही कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दर्जेदार पदार्थ देतो, असे ते पुढे म्हणाले.
आझम कॅम्पसच्या मुख्य दरवाजाजवळ असलेले शालीमारहॉटेल हे रमजानच्या महिन्याच्या काळात आकर्षणाचे केंद्र ठरते कारण अनेक खव्वैय्ये येथे उंची आणि वर्षातून एकदाच येणार्‍या रमजानच्या काळात हॉटेलतर्फे सादर करण्यात येणार्‍या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येथे येतात. या वर्षीच्या खास पदार्थांमध्ये
कोळशावर भाजलेली बकरा रान स्पेशल, अफगाणी लेग, कोळशावर भाजलेली संपूर्ण बकरी, लखनवी पुलाव, किमान आठ प्रकारच्या बिर्याणी आणि सर्वात लोकप्रिय अशी दम बिर्याणीयांचा यंदाच्या खास पदार्थांमध्ये समावेश आहे.
बाजारातील प्रचलित दरांपेक्षा आमच्या जेवणाचे दर 20 टक्के कमी आहेत. आमच्या ग्राहकांच्या मनात स्थान मिळावे, यासाठी आम्ही ना नफा ना तोटा तत्त्वावर काम करतो. मोठ्या प्रमाणात सेवा पुरवत असलो तरी दर्जाच्या बाबतीत आम्ही तडजोड करत नाही. या धोरणामुळे आमच्याकडे अनेक ग्राहक वारंवार येतात, असे त्यांनी सांगितले.
बीफवरील बंदीचा विचार करून यंदा आम्ही चिकनचा आधार घेऊनच सर्व पदार्थांची चाचणी घेऊन ते तयार केले आहेत. इफ्तारच्या दृष्टीने चिकन स्टिक्स, चिकन फ्राईड लेग्ज, ब्रेक का मीठा, गुलाब जामुन, शेजवान चिकन आणि आणखी भरपूर पदार्थ खवैय्यांना तृप्त करण्यासाठी यंदा असणार आहेत. आमच्याकडे समाजातील सर्व थरातील लोक येथे रमजानमधील पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी येतात आणि ते येथून तृप्त होऊन जावेत, यात आम्ही कोणतीही कसर ठेवत नाही. माफक दरांमध्ये मनापासून त्यांचे आदरातिथ्य करणे, हीच आमची इच्छा असते, असे ते म्हणाले.
गेल्या एक दशकापासून हजारो पुणेकरांना स्वच्छ, स्वादिष्ट, माफक दरांमध्ये आणि भरपूर खाद्यपदार्थ पुरविल्याबद्दल अनेक सामाजिक संघटना आणि संस्थांनी नुसरत उस्मान शेख यांचा सत्कार केला आहे.