वक्फ मालमत्ता विकासाबाबत प्रशासकिय व कायदाविषयक कार्यशाळा संपन्न…

महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्सच्यावतीने आयोजन…

पुणे : वक्फसंबधी प्रशासन कसे चालते, कसे चालले पाहीजे? कायदेशिर बाबीची माहीती कशी मिळवणे? दस्तऐवज कोणते आवश्यक आहेत? ते कोठुन मिळवायचे? वक्फ बोर्ड संलग्न झालेवर काय फायदे आहेत? वक्फ बोर्ड व ट्रस्टींचे हक्क कोणते? वक्फ मालमत्तेचा वापर कसा झाला पाहीजे? त्याचा समाजाचे सेवेसाठी वापर कसा करावा? वक्फ मालमत्ता गैरव्यवहार कसे होतात? ते व्यवहार रोखायचे कसे? वक्फ मालमत्ता विकास योजना कशा बनवायच्या? गैरव्यवहार कोण करते? या अनेक गंभीर प्रश्नांचा डोंगर व यातील अडचणी सोडवताना चुकिचे माहीतीमुळे,अज्ञानामुळे समाजाला खुप त्रास सोसावा लागत आहे परिणामी समाजाची खुप मोठी हानी झाली आहे. वक्फ मालमत्तांचा विकास योग्य पद्धतीने झाल्यास समाजाचे मागासलेपण दूर होवु शकतो. महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्सच्या वतीने महात्मा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे वक्फ बोर्डचे प्रशासकिय व कायदाविषयक बाबींवर कार्यशाळा संपन्न् झाली.वक्फ बोर्डाचे संचालक अ‍ॅड.खालीद बाबु कुरेशी कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तर प्रमुख पाहुणे पुणे चॅरिटी कमिशनर साजीद रचभरे हे होते.

या कार्यशाळेत रिटायर्ड इनकम टॅक्स कमिशनर ए.जे. खान साहेब, रिटायर्ड डिस्ट्रीक्ट जज जमिल शेख, रिटायर्ड ऑफिसर विलासत बासले, अ‍ॅड. ए यु पठाण, अ‍ॅड. सईद यांनी प्रशासकीय व कायदेशीर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संयोजन महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरम, अलखादिम फौंडेशन, राबता फौंडेशन,रोशन फौंडेशन, दारे आक्रम एज्युकेशन फौंडेशन, फ्युचर फौंडेशन या सामाजिक संस्थानी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुद्रतुल बेग सर व आभार महाराष्ट्र मायनॉरिटी एनजीओ फोरमचे चीफ प्रमोटर जाकीर शिकलगार यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र वक्फ लिबरेशन अँड प्रोटेक्शन टास्क फोर्स चे अध्यक्ष सलिम मुल्ला म्हणाले, वक्फ मालमत्ता ही मुस्लिम समाजासाठी असलेली खुप मोठी देणगी आहे. मुसलमान समाज दान देणारे होते. परंतु समाजातील जनसेवक व नेतृत्व करणा-या वर्गाने दूर्लक्ष केल्याने वक्फ मालमत्तेची व पर्यायाने मुस्लिम समाजाला मागासलेपणासह अनेक भयंकार बाबीना तोंड देणेची वेळ येवुन ठेपली आहे. अजुनही वेळ न दवडता समाजसेवी व ट्रस्टींनी पुढाकार घेतला पाहीजे. समाजहितासाठी आम्ही बरेच ज्ञानी लोकांना घेवुन टास्क फोर्स स्थापन करुन जनजागृतीचे काम करत आहोत. यासाठी कार्यशाळेचे नियोजन करणेत आले आहे.

मागील तीन वर्षापासुन वक्फ मालमत्ता बाबत प्रशासकीय व कायदेशिर माहीतीचा अभ्यास करुन कोंढवा येथील सर्वे नं 55 मधील 46 एकर जागेतील अतिक्रमण व गैर खरेदीव्यवहार रोखण्यात सनदशीर मार्गाने यश मिळाले आहे तसेच मोठे यश म्हणजे औरंगाबाद येथे वक्फचे 100 एकर जागेत 100 कोटी अनुदानासह स्किल डेवलपमेंट युनिवर्सिटी शासनाकडुन मंजुर झाली आहे. यामुळे मुस्लिम समाजातील शैक्षणिक मागस लोकांना शासनमान्य तांत्रिक प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे. याशिवाय अनेक वक्फ मालमत्ता चे प्रश्न आम्ही हाताळत आहोत. यापुढे आम्ही सातत्याने संपुर्ण महाराष्ट्रात वक्फबाबत प्रशासकीय कायदाविषयक जनजागृती अभियान राबवणार असुन ट्रस्टी व समाजसेवी लोकांना याबाबत मार्गदर्शन करत आहोत. मार्गदर्शन घेवु इच्छिणारे ट्रस्टी व समाजसेवी लोकांनी टास्क फोर्स शी संपर्क करु शकतील.