कार्यशाळेचा असंख्य महिला व युवतींनी घेतला लाभ

Share this News:

                   नगर- येथील प्रतिबिंब संस्थेच्या वतीने श्री मानकन्हय्या  ट्रस्ट   सहकार्याने जागतिक महिला दिनानिम्मित पंधरा कॉलेजेस व महिला मंडळाच्या येथे  फिल्म मेकअप आर्टिस्ट  व हेअर स्टायलिस्ट अनुजा  कांबळे यांनी ,स्वताचा  मेकअप व ग्रुमिंग यावर कार्यशाळा घेतल्या त्याचा लाभअसंख्य युवती व महिलांनी घेतला

          सुमारे महिनाभर हा उपक्रम चालू होता नगर मधील दिल्लीगेट येथील दिक्षित कार्यलयामध्ये हि वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते यावेळी   अनुजा  कांबळे म्हणाल्या सगळ्या स्त्रिया मुळातच सुंदर असतात पण ती सुंदरता अजून चांगली दिसण्यासाठी मेकअपची आवश्यकता असते

      त्यांनी  पसर्नल मेकअप कसा करावा ,कार्पोरेट मेकअप , कॉलेजमध्ये कसा मेकअप असावा हे प्रात्यक्षिकासह करून दाखवले.विद्यार्थिनीच्या  विविध प्रश्नाची विविध संधर्ब देवून  उत्तरे  त्यांनी दिली  ड्रेस , बोलणे कसे असावे हे सांगून साडी ड्रेपिंग करून दाखविले

       कार्यक्रम यशस्वितेसाठी कल्याणी तेंडूलकर ,प्रा चैताली लोढा, ज्योती दांडगे , शिल्पा जावळे ,कीर्ती खेडेकर , वर्षा राउत , स्वाती भोंडवे , महेश कांबळे , दत्ता पवार , संजय कुलकर्णी तसेच विविध कॉलेजेची विद्यार्थिनी मंडले , महिला प्राध्यपिका, प्रतिबिंबसंस्था व श्री मानकन्हय्या ट्रस्टने प्रयत्न केले

       उन्हाळ्याच्या सुट्टीत हि अश्या प्रकारचे वर्कशॉप घेण्यात येणार असून त्याचा जास्तीत जास्त  महिला व युवतींनी  फायदा  घ्यावा असे आवाहन  संयोजकांनी  केले आहे.या वर्कशॉपमधे सहभागी  होण्यासाठी  अथवा  अधिक  माहितीसाठी स्पार्कल  मेकअप स्टुडिओ, स्टेट  बँक शेजारी दिल्लीगेट , अहमदनगर, मो . नं .९८२२११८९१३ वर  संपर्क  साधावा