Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

अमेय वाघची ‘गर्लफ्रेंड’ नक्की कोण?

Share this News:

10 May 2019 : सोशल मिडीयावर काही दिवसांपूर्वी अभिनेता अमेय वाघने जरा मदत हवीये तुमची! मुलीसाठी नाव सुचवा प्लीज! असे आवाहन केले होते, त्यानंतर दम असेल तर गर्लफ्रेंडचं नाव सांगा! अशी पोस्ट केली होती. या दोन्ही पोस्टमुळे अनेक तर्क वितर्क लढवण्यात येत होते, मात्र या पोस्ट अमेयच्या आगामी चित्रपटासंबधी असल्याचे अखेर स्पष्ट झाले असून या चित्रपटाचे नाव ‘गर्लफ्रेंड’ असल्याचेही समोर आले आहे. यामुळे अमेयच्या नव्या चित्रपटात त्याची गर्लफ्रेंड नक्की कोण? याची चर्चा सुरु झाली आहे. अमेयने यापूर्वी ‘मुरांबा’ मध्ये मिथीला पालकर आणि ‘फास्टर फेणे’ मध्ये पर्ण पेठे सोबत काम केले आहे, आता त्याची नवी गर्लफ्रेंड कोण असणार? हा औत्सुक्याचा विषय ठरला आहे. ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटाची निर्मिती अनिश जोग आणि रणजीत गुगळे यांनी केली आहे, त्यांनी यापूर्वी ‘टाइम प्लीज’, ‘डबल सीट’, ‘मुरांबा’, ‘YZ’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Follow Punekar News: