Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

आयआयएफएल’ज 5Paisa.com बनली भारताची 1 लिस्टेड डिस्काउंट ब्रोकरेज कंपनी; प्रती व्यवहार रु. 10 शुल्क म्हणजे झिरो ब्रोकरेज आकारून समभाग गुंतवणुकीची सवलत  

Support Our Journalism Contribute Now

मुंबई, 16 नोव्हेंबर 2017 5Paisa कॅपिटल लिमिटेड – ही आयआयएफएल होल्डिंग्ज लिमिटेडची 100 टक्के सहाय्यक आहे. आज ती भारताची पहिली ऑनलाइन सवलतीत ब्रोकरेज आकारणारी कंपनी असून बीएसई आणि एनएसईवर लिस्ट झाली आहे. 5Paisa ने भांडवली बाजारात नव्याने प्रवेश केला असून राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) वर पारंपरिक गॉंगचा आवाज घुमविण्यासाठी सज्ज आहे.

5Paisa चे समभाग; ज्यांचे दर्शनी मूल्य प्रत्येकी रु. 10 आहे; आयआयएफएल होल्डिंग्जच्या सर्व सध्याच्या समभागधारकांना 25:1गुणोत्तराची ऑफर देण्यात आली आहे. पालक कंपनीने अगोदर रु 100 कोटी विसर्जित कंपनीत ताज्या भांडवलापोटी गुंतवले होते.

5Paisa ही वित्तीय उत्पादन आणि सेवांसाठीची वेगाने विस्तारणारी आणि संपूर्णत: डिजीटल मार्केटप्लेस आहे. जी स्वत:चे व्यवहार स्वत: पाहणाऱ्या (डीआयव्हाय) ग्राहक प्रकारासाठी आहे. ज्यामध्ये सर्वात कमी मध्यस्थी शुल्क (ब्रोकरेज) आकारले जाते. कंपनी ग्राहकांकडून शून्य ब्रोकरेज आकारते. ग्राहकांच्या व्यवहाराचे आकारमान कितीही असो प्रत्येक व्यवहारापोटी रु. 10 इतके शुल्क घेण्यात येते. म्युच्युअल फंड्स, आयपीओ, इन्श्युरन्स, रोबो अॅडव्हायजरी आणि संशोधन यासारख्या सेवा कंपनीतर्फे देण्यात येतात.

अशाप्रकारची सेवा देणारी आधार व डिजीटल स्वाक्षरीसहित ई-केव्हायसी आधारित कंपनी आहे. ज्यामुळे खाते उघडण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आणि पेपरलेस झाली आहे. 5Paisa ची रोबो अॅडव्हायजरी अभिनव असून अल्गोरिदम आधारित, सुनिश्चित वेळेत अपेक्षेनुरूप (कस्टमाईज्ड) सल्ला सेवा कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय; किफायतशीर किमतीत देते. रोबो अॅडव्हायजरी केवळ समभागांसाठी नसून म्युच्युअल फंड्स आणि इन्श्युरन्सकरिता आहे. 5Paisa ची अमेरिकेतील मार्केट स्मिथ या जागतिक दर्जाच्या संशोधन कंपनीसोबत खास भागीदारी असून ही 85 वर्षे जुनी कंपनी असून सुमारे 4,000 हून अधिक भारतीय कंपन्यांची नोंद (ट्रॅक) ठेवते.

ग्राहकांसाठी कंपनीने अगदी उलट पद्धतीचा अवलंब करून अल्प आकार घेऊन ग्राहकांपर्यंत सेवा पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. 5Paisa चा ट्रेडिंग प्लॅटफॉर्म सर्वोत्तम आहे. ही कंपनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत 98 टक्के कमी शुल्क आकारते.

या संदर्भातील विकासाची माहिती स्पष्ट करताना आयआयएफएल समुहाचे संस्थापक आणि अध्यक्ष श्री. निर्मल जैन म्हणाले की, “5 Paisa चे लिस्टिंग झाल्याने आयआयएफएल समूह आपली कॉर्पोरेट प्रशासन आणि नैतिक व्यवसायाची परंपरा राखणार आहे, त्याशिवाय ग्राहकांना किफायतशीर किमतीत सर्वोत्तम सेवा देत राहील. या पद्धतीने आम्ही संस्थात्मक मंचासोबत पहिला डिजीटल आधारित व्यवसाय वित्तीय सेवा देत आहोत. यामधील व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आणि नैतिक राहतील याची खातरजमा करण्यात आली आहे. लिस्टिंगमुळे कामात अधिकाधिक पारदर्शकता येईल, उच्च प्रतीची मान्यता व 5paisa.com च्या रिटेल आणि संस्थात्मक गुंतवणूकदाराला समभाग खरेदीमार्फत विकासात सहभागी होण्याची संधी प्राप्त होईल.”

5paisa.com चे सीईओ श्री. प्रकर्ष गागदानी म्हणाले की, “5Paisa ने आपले अभिनव पर्याय; (जसे की- अपेक्षेनुरूप (कस्टमाईज्ड), पूर्ण पेपरलेस, वापरण्यास सुलभ) संपूर्ण गुंतवणूक प्रक्रिया सर्वांसाठी खुली केली आहे. शिवाय ही सेवा अल्प आणि किफायतशीर किंमतीत आहे. इक्विटी,डेरिव्हेटिव्ह, म्युच्युअल फंड, एआयएफ, बॉंडस आणि डिबेंचर्स, विमा, वैयक्तिक कर्ज, संशोधन आणि सल्लागार,पोर्टफोलिओ सेवा आणि इतर वित्तीय उत्पादने डीपी आणि मार्जिन ट्रेडिंग अशा सर्व वित्तीय उत्पादनांसोबत एक परिपूर्ण डिजीटल मार्केटप्लेस म्हणून उदयाला येण्याचे उद्दिष्ट्य आहे. या लिस्टिंगमुळे आम्हाला आवश्यक प्रमाणावर आमच्या स्वप्नांची जाणीव झाली आहे.”

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.