Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर

पिंपरी, पुणे (दि. 28 एप्रिल 2018) केंद्रातील भाजपच्या चार वर्षाच्या सत्ताकाळात पेट्रोलीयम पदार्थांचे दर गगनाला भीडले आहेत. या दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत असून सरकारला मात्र केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपने नागरिकांना ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून सत्ता मिळवली. परंतु चार वर्षातील भ्रष्ट कारभारामुळे नागरिकांचा भ्रम निरास झाला असून जनता योग्य वेळी त्‍यांना धडा शिकवेल. तसेच यापुढील काळात पेट्रोलीयम पदार्थांची दरवाढ कमी न केल्‍यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी जिल्‍हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघिरे पाटील यांनी शनिवारी चिंचवड येथे दिला.

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्‍वाखाली पेट्रोल-डिझेलच्या दरवाढी विरोधात चिंचवड येथे दुचाकीची अंतयात्रा काढण्यात आली. या अंतयात्रेची सांगता मोरया गोसावी मंदिराजवळील घाटावर करण्यात आली. या अंतयात्रेत वारकरी पथक, सर्वसामान्य नागरिक, कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सरकार विरोधी घोषणा देण्यात आल्‍या. यावेळी माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, शिक्षण समितीचे माजी सभापती फजल शेख, प्रदीप गायकवाड, लाला चिंचवडे, निलेश डोके, युवती आघाडीच्या वर्षा जगताप, आलोक गायकवाड, सुनील गव्हाणे, यतिन पारिख, रशिद सय्यद, चैतन्य चोरडिया, साकी गायकवाड, गंगाताई धेंडे, मंगेश बजबळकर, साईश कोकाटे, विजय गावडे, अमोल पाटील, राजेंद्र थोरात, निलेश निकाळजे, विशाल पवार, प्रशांत सपकाळ, मयुर जाधव, प्रतिक साळुंखे, चंद्रकांत जाधव, विश्रांती पाडळे, रुपाली गायकवाड, लता ओव्हाळ, आशा शिंदे, मिनाक्षी उंबरकर, सनी डहाळे आदी उपस्थित होते.

विशाल वाकडकर म्‍हणाले, काँग्रेस सरकारच्या राजवटीत 2013-14 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलचे प्रती बॅरल दर 105 डॉलर तर भारतामध्ये पेट्रोल 65 रुपये प्रती लिटर होते. त्‍यावेळेस भाजपने काँग्रेस विरोधात रान पेटवले होते. आज 2018 मध्ये पेट्रोल प्रती बॅरल 65 डॉलर असून भारतात पेट्रोल 85 रुपयांवर गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपला सर्वसामान्यांविषयी थोडीसुध्दा आत्मियता नसून त्यांचे नेते आणि सरकार धनदांडग्‍यांशी संगनमत करून नवनवीन भ्रष्टाचार करत असल्‍याचे समोर येत आहे. आंदोलनाची दखल घेऊन सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली नाही तर यापुढील काळात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे वाकडकर म्‍हणाले.