एडव्होकेट समीर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या लीगल सेल च्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती

IMG-20190630-WA0018.jpg
Share this News:

पुणे :

एडव्होकेट समीर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस च्या लीगल सेल च्या प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे .

राष्ट्रवादी काँग्रेस च्या लीगल सेल चे अध्यक्ष एडव्होकेट आशीष देशमुख यांनी ही नियुक्ती केली असून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस एडव्होकेट *भगवानराव साळुंखे यांनी नियुक्तीचे पत्र शेख यांना दिले .

शेख यांनी मागील सहा वर्षे लीगल सेल च्या राज्य कार्यकारिणी वर कार्य केले आहे . उच्च्न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात यावे म्हणून वेळोवेळी झालेल्या वकिलांच्या आंदोलनात, तसेच मराठा आरक्षणा साठी झालेल्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता, मुस्लिम समाजात तलाक होऊ नये या साठी पुढाकार घेऊन अनेक घटस्फोट थांबवले आहेत, समाज सुधारणे साठी अनेक क्षेत्रात ते मागील 20 वर्षे कार्यरत आहेत.

सामाजिक सौख्य आणि एकता नांदावी या साठी अनेक उपक्रम राबविले आहेत.अनेक मस्जिद, मंदीर, आणि चर्च यांचे सल्लागार आहेत.अनेक शाळांच्या सल्लागार पदावर असून माहिती अधिकारात सन 2004 पासून काम केले आहे आणि अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत.

त्यांचे शिक्षण M. Com., LL.M., D. L. L., D.B.M. G.D. C. A. इतके झालेले आहे. ते फायनान्शियल कन्ज्युमर्स प्रोटेक्शन फोरम चे संस्थापक अध्यक्ष असून खासगी फायनान्स ची वसुली साठी होणारी गुंडगिरी आणि गुंडांचा वापर रिजर्व बँके मार्फत थांबवण्यात महत्वाची भूमिका आहे.