कॉमिओतर्फे नवीन एस1 लाइट आणि सी 2 लाइट सादर

Share this News:

कॉमिओ इंडिया या भारतीय तरूणांच्या बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करणार्‍या स्मार्टफोन ब्रँडने नवीन वैशिष्टयांनी समृद्ध कॉमिओ एस1 लाइट आणि सी2 लाइट हे दोन स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत. सौंदर्य आणि कार्यक्षमता या दोन्ही बाबी लक्षात ठेवून डिझाइन करण्यात आलेले हे स्मार्टफोन्स एस1 लाइट 7499 रूपये आणि सी2लाइट 5999 रूपये एवढ्या किमतीत आणले गेले आहेत.

आधीच्या मॉडेल्सच्या यशस्वी अनावरणाच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात असताना नवीन कॉमिओ एस1 लाइट आणि सी2 लाइटमध्ये कॉमिओ एस1 आणि सी-2 या कॉमिओच्या सर्वाधिक लोकप्रिय स्मार्टफोन्सची अत्यंत सुंदर डिझाइन आहे आणि हे फोन्स पुढील आठवड्यापासून उत्तर आणि पश्चिमेकडील बाजारांमध्ये उपलब्ध होतील. लाइट रेंजमध्ये अत्यंत आगळीवेगळी वैशिष्टे आहेत जसे सुंदर डिझाइन, कॉमिओ यूआयवर आधारित ऑन स्टॉक अँड्रॉइड ओएस, शक्तिशाली बॅटरी बॅकअप, ओटीजी आणि इतर अनेक सुरक्षा वैशिष्ट्ये.

कॉमिओ स्मार्टफोन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्री. संजय कलिरोना पुढे म्हणाले की, भारत ही वाढती बाजारपेठ असून येथे प्रचंड क्षमता आणि अगणित शक्यता आहेत. आम्हाला आमच्या ग्राहकांसाठी आमची नवीन उत्पादने- कॉमिओ एस1 लाइट आणि सी2 लाइट आणताना खूप आनंद वाटत आहे. त्यात फक्त सुंदर डिझाइन आणि कॅमेराच नाही तर उत्तम बॅटरी आयुष्यही आहे. ही लाइट मालिका ऑलराऊंडर ठरेल यात शंका नाही. उत्तम दर्जाची उत्पादने सर्व ग्राहकांना उत्तम किमतीत देण्यावर कॉमिओचा विश्वास आहे.

एस1 लाइटसोबत येणारे उत्तम डिझाइन आणि डिस्प्लेसोबत नजरेत उठून दिसाल ज्यात 13 मेगापिक्सेल रेअर आणि 8 मेगापिक्सेल फ्रंड कॅमेरा आणि इतर अनेक वैशिष्टे आहेत जसे सौंदर्य, बोके, पॅनोरमा, वॉटरमार्क, एचडीआर, फिल्टर आणि स्माइल कॅप्चर इफेक्ट्स. कॉमिओ एस1 लाइटमध्ये एक युनिबॉडी डिझाइन आहे आणि वळणदार कोपरे आहेत. हा फोन तीन रंगांत उपलब्ध आहे जसे ओशियन ब्लू, रॉयल ब्लॅक आणि सनराइज गोल्ड. या हँडसेटचा यूएसपी त्याच्या स्लिम डिझाइनमध्ये आणि मेटॅलिक फिनिशमध्ये आहे ज्यामुळे फोन वापरण्यास अत्यंत सुलभ होतो आणि तो तितकाच नजरेलाही सुंदर दिसतो. आपण यातील 13 मेगापिक्सेल ऑटो फोकससोबत असलेल्या फ्लॅश रेअर कॅमेर्‍याद्वारे आणि 8 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा विथ फ्लॅशसोबत आपल्या आतील फोटोग्राफरला जागृत करू शकतो कारण त्यातून अत्यंत बारीक तपशीलही टिपले जातात. कॉमिओ एस1 लाइटच्या मागील बाजूस सुंदर बॅक कव्हर फिनिश आहे ज्यातून लाइट स्टायलिश पद्धतीने दिसते. यात 5.0 इंच एचडी आयपीएस डिस्प्ले दाखवणार्‍या सडपातळ, सरळ बॉडीसह असलेल्या या फोनमध्ये 2 आणि 32 जीबी रॅम तसेच 3050 एमएएच बॅटरी आहे ज्यामुळे कॉमिओ एस1 हा अत्यंत सुयोग्य फोन ठरतो.
फुल्ली लोडेड कॉमिओ सी2 लाइटसोबत तुमचा वेगळेपणा दाखवून द्या. त्यात एक शक्तिशाली ली पॉलिमर आणि 3900 एमएएच बॅटरी आहे. कॉमिओ सी 2 लाइटमध्ये विविध प्रकारची उत्तम वैशिष्टे आहेत. त्यात एक शक्तिशाली बॅटरी, सुंदर सिक्युरिटी फीचर्स, 8 मेगापिक्सेल ऑटो फोकस रीअर कॅमेरा फ्लॅशसोबत, 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा फ्लॅशसोबत, एक्स्पांडेबल 128 जीबी मेमरी आणि सुंदर संगीत दर्जा आहे. यात मुख्य लक्ष डिझाइनवर देण्यात आले आहे. सी2 लाइटमध्ये एक 5 इंच एचडी आयपीएस डिस्प्ले असून तो सनराइज गोल्ड, रॉयल ब्लॅक आणि मेटॅलिक ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे. या कॅमेर्‍याचे ब्युटी फंक्शन हे आणखी एक वैशिष्टय आहे. त्यात स्टॉक अँड्रॉइड 7.0 नगेटवर आधारित कॉमिओ यूआय आहे. कॉमिओ सी2 लाइटमध्ये 3900 एमएएच बॅटरी असून ती 2 दिवसांपर्यंत चार्ज राहते आणि त्यात 27 तासांचा टॉकटाइम तसेच 270 तासांचा स्टँडबाय टाइम मिळतो.

Follow Punekar News: