Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

गणेशोत्सवात महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपचा पुण्यात जागर

पुणे, दि. 08 : वीजग्राहकांसाठी महावितरणने विकसीत केलेल्या मोबाईल अ‍ॅपचा गणेशोत्सवानिमित्त पुणे परिमंडलात जागर करण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील सर्वच वीजग्राहकांनी हा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात पोस्टर्स, स्टॉल्स, माहितीपत्रक, जिंगल्स, ध्वनीचित्रफित, डिजिटल बोर्ड, सोशल मिडिया आदींच्या माध्यमातून मोबाईल अ‍ॅपचा जागर करण्यात येत आहे. महावितरणची ग्राहकसेवा एका क्लिकवर उपलब्ध झाल्याने या मोबाईल अ‍ॅपला ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या दोन महिन्यांत 4 लाख 58 हजारांपेक्षा अधिक ग्राहकांनी महावितरणचा अ‍ॅप डाऊनलोड केलेला आहे.

वीजग्राहकांसाठी असलेल्या मोबाईल अ‍ॅपमधून उच्च व लघुदाब (एलटी व एचटी) वीजजोडणीची मागणी करता येणे शक्य झाले आहे. चालू व मागील देयके पाहणे आणि त्याचा भरणा करण्यासाठी नेटबॅकींग, क्रेडीट/डेबीट कार्डासह मोबाईल वॅलेट व कॅश कार्ड्‌सचा पर्याय आहे तर भरलेल्या पावतीचा तपशीलही मिळणार आहे. वीजसेवेबाबत टोल फ्री क्रमांकावर संपर्काची व तक्रारी करण्याची सोय आहे. ग्राहकांना त्यांच्या एकाच खात्यातून स्वतःच्या अनेक वीजजोडण्यांबाबतही सेवा उपलब्ध आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना इतर सेवांसाठी मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडीची नोंदणी किंवा ते अद्यायावत करण्याची सोय आहे. मीटर रिडींग न घेतलेल्या वीजजोडण्यांच्या ग्राहकांना देयके तयार करण्यापूर्वी एसएमएसद्वारे लिंक पाठविण्यात येणार असून संबंधीत ग्राहकांना त्यांच्या मोबाईलमधील अ‍ॅपद्वारे मीटर रिडींग घेऊन ते महावितरणकडे पाठविण्याची सोय होणार आहे. सोबतच ब्रेकडाऊन किंवा देखभाल व दुरुस्तीमुळे ज्या वाहिनीवरील वीजपुरवठा खंडित होईल तो पूर्ववत होण्याचा कालावधी वीजग्राहकांना एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. यासह महावितरणच्या सेवेबाबत वीजग्राहकांना फिडबॅक देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. हा मोबाईल अ‍ॅप इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून ‘अ‍ॅन्ड्राईड’, ‘विन्डोज’ व ‘आयओएस’ ऑपरेटींग सिस्टीमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड होईल करता येईल. महावितरणच्या .. या वेबसाईटसह गुगल प्ले-स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरमधून हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सोय आहे. (दोन फोटो)