पोलीस आयुक्तलायाचा प्रश्न मार्गी लावा; अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या दुरावस्थकडे; आमदार महेश लांडगे यांनी अधिवेशनात सरकारचे वेधले लक्ष्य

Share this News:

पिंपरी, 22 मार्च – पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. औद्योगिकरणात वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबच शहरातील गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिला, विद्यार्थींनी यांची सुरिक्षतता राखण्यासाठी पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा रखडलेला प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी, भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत केली. तसेच अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या दुरावस्थकडे लक्ष्य वेधत त्याच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने मदत करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

राज्याच्या 2018-19 या आर्थिक वर्षाच्या बजेटच्या अनुदान मागण्यावर आमदार महेश लांडगे विधानसभेत बोलत होते. राज्य सरकारने कुस्ती क्षेत्राला न्याय दिला आहे. ऑलम्पिकमध्ये कुस्तीखेळाने पदक मिळवून दिले आहे. महाराष्ट्र केसरी विजय चौधरी राज्य सरकारच्या पोलीस सेवेत कार्यरत आहे. क्रीडा क्षेत्रासाठी राज्य सरकाराने प्रोत्साहन दिले आहे. आगामी काळात देखील खेळांडूसाठी अशाच प्रकारच्या सवलती, योजना राबवव्यात.

ऑलम्पिक मध्ये देशाला पदक मिळविण्यासाठी खेळाडूंना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यासाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षक सरकारने नेमावेत. त्यासाठी प्रयत्न करावेत. कुस्ती खेळासाठी मॅट उपलब्ध करुन देण्यासाठी तरतूद करावी. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवड पालिकेच्या माध्यमातून अण्णासाहेब मगर स्टेडियम सुरु आहे. या स्टेडियमच्या दुरावस्थाकडे देखील आमदार लांडगे यांनी सरकारचे लक्ष वेधले. स्टेडियमची दुरुस्ती करण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे. औद्योगिकरणात वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबच शहरातील गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिला, विद्यार्थींनी यांची सुरिक्षतता राखण्यासाठी पोलिस यंत्रणा कमी पडत आहे. राज्य सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मंजूर केले आहे. पोलीस आयुक्तालयाचा प्रस्ताव पुणे पोलीस आयुक्तालयामार्फत पोलीस महासंचालकाच्या शिफारशीने गृह विभागाकडून वित्त विभागाकडे पदे मंजुरीसाठी व अन्य बाबींच्या मंजुरीसाठी पाठविला आहे. परंतु, हा प्रस्ताव गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असून त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाचा रखडलेला प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची जोरदार मागणी, आमदार लांडगे यांनी विधानसभेत केली.