फक्त मराठीवर ‘लक्षातला लक्ष्या’

just pune things app
Share this News:

भन्नाट विनोदी टायमिंगने दीर्घकाळ रसिकांना हसवत ठेवणारा चतुरस्त्र अभिनेता म्हणून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपली ओळख निर्माण केली. सा-यांचा लाडका लक्ष्या’ म्हणून त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं. प्रेक्षकांच्या अशा या लाडक्या लक्ष्याच्या स्मृतीनिमित्त फक्त मराठी या चित्रपट वाहिनीने या लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या चित्रपटांची खास भेट प्रेक्षकांसाठी आणली आहे. शनिवार १६ डिसेंबर ते शुक्रवार २२ डिसेंबर दरम्यान दररोज रात्री ९.३० वाजता हे चित्रपट प्रेक्षकांना पहाता येतील. कुटुंबातील सर्वांना एकत्र बसून सहकुटुंब या चित्रपटांचा आनंद घेता यावा म्हणून रात्री ९.३० वाजताची वेळ या चित्रपटांसाठी ठेवण्यात आल्याचे फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी सांगितले.

रंगभूमी छोटा पडदा, अथवा हिंदी मराठीचा मोठा पडदा असो प्रत्येक ठिकाणी ‘लक्ष्या’ने आपली छाप सोडली. १६ डिसेंबर २००४ ला ‘लक्ष्या’ने जगाचा निरोप घेतला, मात्र त्यांनी साकारलेल्या अनेक भूमिका रसिकांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत. आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून प्रत्येकाला सदैव हसवत ठेवणाऱ्या या हरहुन्नरी कलावंताच्या बाबतीत एकच सांगावेसे वाटते. ‘लक्ष्या’ तुला विसरणं शक्य नाही’.

प्रसारण – १६ डिसेंबर ते शुक्रवार २२ डिसेंबर दरम्यान दररोज रात्री ९.३० वाजता