भारतीय जनता पार्टी पुणे शहर वतीने जाहीर निषेध

आचारसंहिता सुरू असताना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही हे माहीत असूनही, पीएमपीच्या प्रवाश्यांच्या समस्या समजावून घेण्याची नौटंकी करीत पुण्याच्या महापौरांनी पीएमपी बसमधून प्रवास केला
हा प्रवास त्यांनी महिलांसाठी आरक्षित आसनावरून केला. महापौरांनी केलेल्या या स्टंटबाजीचा भाजपच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत फलक दाखवून आणि घोषणा देत जाहीर निषेध केला.
तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या पुण्याबाबतच्या कथित अनुद्गाराबद्दल तीव्र शब्दांत धिक्कार करण्यात आला.