महावितरणची ग्राहकसेवा गतीमान अन्‌ पारदर्शक

just pune things app
Share this News:

सनियंत्रण समितीचे सदस्य श्री. नितीन गुजराथी यांचे प्रतिपादन

पुणे, दि. 18 : प्रादेशिक कार्यालय अस्तित्वात आल्यापासून महावितरणच्या कार्यालयीन कामकाज अधिक शिस्तप्रिय झाले आहे. ग्राहकसेवा सुद्धा आणखी गतीमान व पारदर्शक होत आहे असे प्रतिपादन पुणे जिल्हा विद्युत वितरण सनियंत्रण समितीचे सदस्य श्री. नितीन गुजराथी यांनी केले.

येथील प्रकाशभवनमध्ये महावितरणचे प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांची श्री. गुजराथी यांनी नुकतीच भेट घेतली व विविध मुद्‌द्यांवर चर्चा केली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्री. रवी अनासपुरे, नगरसेवक श्री. महेश लडकत, नगरसेवक श्री. योगेश समेळ, श्री. विनायक आंबेकर आदींची उपस्थिती होती. यावेळी श्री. गुजराथी म्हणाले, की प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील महावितरणचे प्रशासन अधिक ग्राहकाभिमुख झालेले आहे. थकबाकी वसुली, विविध ग्राहकसेवांची गतीमान व पारदर्शकपणे अंमलबजावणी, ग्राहक संपर्क, बिलींगमधील सुधारणा, मीटर उपलब्धतता व त्याबाबत सातत्याने ग्राहकांना माहिती देणे, स्वयंघोषित एंजटांना पायबंद घालण्याचे प्रयत्न उल्लेखनीय आहे. यावेळी श्री. गुजराथी व सहकार्‍यांनी प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे यांचा अभिनंदन पत्र प्रदान करून गौरव केला.

यावेळी प्रादेशिक संचालक श्री. ताकसांडे म्हणाले की, महावितरणसाठी ग्राहक हाच सेवेचा केंद्गबिंदू आहे. सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे सेवा देण्यासाठी महावितरण कटिबद्ध आहे. पुणे प्रादेशिक विभाग हा महाराष्ट्रातील इतर प्रादेशिक विभागांसाठी ग्राहकसेवा, प्रशासकीय कामकाजामध्ये एक मॉडेल राहील यादृष्टीने सुधारणा व उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाळ्यापूर्वीच्या वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही यावेळी प्रादेशिक श्री. ताकसांडे यांनी दिली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले महावितरणचे मीटर रिडींग, नवीन वीजजोडणी, कर्मचारी मित्र व वीजग्राहकांसाठी असलेले विविध मोबाईल अ‍ॅप तसेच एम्प्लॅाई पोर्टल, डॅशबोर्ड आदींची माहिती यावेळी देण्यात आली.