Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

रोटरीचा इथोपीयामधील आंधळेपणा मुक्तिसाठी पुढाकार

Support Our Journalism Contribute Now

३ लाख इथोपीयन नागरिकांना थेट फायदा

१० उपकरणे, १० डॉक्टरांना प्रशिक्षणासाठी १,२२,२५० डॉलर्सचा प्रकल्प

रोटरीचे प्रांतपाल प्रशांत देशमुख यांच्या हस्ते इथोपीयाच्या मंञ्यांकडे मदत सूपूर्द

पुणे : रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३१ च्या निगडी क्लबच्या पुढाकाराने पूर्व आफ्रिकेतील इथोपीया या आंधळेपणाच्या आजाराने ग्रस्त देशामध्ये वैद्यकीय सूविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे तेथील लाखो नागरिकांना थेट फायदा होणार आहे.

इथोपीयामध्ये नूकतेच झालेल्या एका कार्यक्रमामध्ये रोटरीच्या भारत (डी.३१३१) फिनलँड आणि दक्षिण कोरीया या देशातील रोटरी डीस्ट्रीक्टच्या मदतीने संयुक्तरित्या या उपक्रमासाठी निधी, वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या उपकरणांचे आणि सुवधिांचे हस्तांतरण रोटरी ३१३१ चे प्रांतपाल प्रशांत देशमुख यांच्या हस्ते इथोपीयाचे आरोग्य राज्य मंञी केबेडे वोर्कू यांच्याकडे करण्यात आले. यावेळी भारताचे राजदूत अनुराग श्रीवास्तव, रो. पद्मजा देशमुख, आणि रोटरीचे सुमारे ३४ सदस्य यावेळी उपस्थित होते.

याप्रकल्पासाठी एकूण १,२२,२५० अमेरीकन डॉलरचा खर्च करण्यात येत असून, रोटरीचे विनोद बन्सल यांच्या नेतृत्वाखालील राटेरीयन्सने ५४ हजार अमेरीकन डॉलरचा निधी संकलीत केला असून, त्यांना कोरीयातील रोटरीने २० हजार डॉलर आणि फिनलँड रोटरीने १५ हजार डॉलरची मदत केली आहे. तसेच रो. शेखर मेहता, राजा साबू, कल्याण बॅनर्जी, राशींगकर, मोहन पालेशा, आदींनी या प्रकल्पासाठी मेहनत घेतली आहे.

इथोपीया हा पूर्व आफ्रिकेतील ९० मीलनयन (दक्षलक्ष) लोकसंख्या असलेला देश असून, येथे डोळयाशी संबंधीत रूग्णांची संख्या लक्षणीय आहे. नविन माहितीनुसार सुमारे ४ मीलयन (दक्षलक्ष) लोक दूर करता येणा-या दृष्टीहीनतेच्या आजाराने ग्रस्त आहे. यासाठी इथोपीयाचे आरोग्य मंञालय विविध संस्थांच्या मदतीने ग्रामीण भागामध्ये काम करत आहे.

या पार्श्वभूमीवर रोटरी ३१३१ निगडी क्लबचे रो. र.सिंघानीया आणि श्रीकृष्ण करकरे व त्यांच्या सहका-यांनी इथोपीया सरकारच्या या प्रयत्नांना मदत करण्यासाठी १० वैद्यकीय उपकरणे आणि त्या चालवण्यासाठी १० डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी इथोपीयन एअरलाईन्सनी डॉक्टर आणि संबंधीत लोकांच्या प्रवासासह  उपकरणांच्या ने – आण करण्यासाठी सहकार्य केले.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.