अभिनेता विशाल लांबा मुख्य भुमिकेत असलेला व्हिडिओ अल्बम अधुरा लॉच
पुणे : तारक मेहता का उलटा चष्मा मध्ये काम केलेले कलाकार अभिनेता विशाल लांबा यांची मुख्य भुमिका असलेला अधुरा व्हिडीओ अल्बम नुकताच प्रदर्शित झाला आहे. में अधुरा – अधुरा जी रहा हू असे या अल्बमचे बोल आहेत. या अल्बमला एका दिवसात 25000 व्हिवर लाभले आहे. पहिल्याच दिवशी एवढ्या मोठ्याप्रमाणात प्रथमच अशा अल्बमला चाहते लाभले आहेत.
सुमित शोरिया यांनी अधुरा हा अल्बम सादर केला असून, त्यांनीच संगीत दिले व गीत गायले आहे. या अल्बम मध्ये स्टार कास्ट अभिनेता विशाल लांबा व सत्यामावदा सिंग आहेत. गीत अंकी तिवारी यांनी लिहले असून अल्बमचे दिग्दर्शन युक्ती कश्यप व प्रोडयुसर ज्योती सुवर्णा आहेत. झी मुझिक कंपनीच्या वतीने अधुरा हा व्हिडीओ अल्बम लाँच केला आहे. यु ट्युब वर एका दिवसात सुमारे 25000 व्हीवर लाभले आहेत. या व्हिडीओ अल्बम मध्ये मुख्य भुमिकेत विशाल लांबा यांनी कास्ट केले आहे. अभिनेता विशाल लांबा यांनी तारक मेहता का उलटा चष्मा, चिडीया घर, क्राईम पेट्रोल, बालिका वधु या सिरिअल मध्ये वेगवेगळ्या भुमिका साकारल्या आहेत. तसेच फक्त 4 वर्षात विविध सिरिअल मध्ये 40 पेक्षा जास्त विविध भुमिका अभिनेता विशाल लांबा यांनी निभावल्या आहेत. अभिनेता विशाल लांबा यांना कॉरपोरेट दिवाळी कार्यक्रमात अंतर्गत पुरस्कारही मिळाला आहे.
अभिनेता विशाल लांबा यांनी छोड्या मोठ्या भुमिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली. आज अधुरा ह्या अल्बम मधेय मुख्य भुमिका साकारली आहे. त्यांची यशाची ही घोडेदौड अशी राहण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी त्याना शुभेच्छा ही दिल्या आहेत.
