‘ अवामी महाज ‘ संघटनेकडून वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय शिबीर
पुणे :
‘ अवामी महाज ‘ या सामाजिक संघटनेतर्फे वारकरी बांधवांसाठी मोफत वैद्यकीय उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जून रोजी मुस्लीम कोऑपरेटिव्ह बँक, रविवार पेठ, पुणे येथे हे शिबीर झेड. व्ही.एम. युनानी मेडिकल कॉलेज, ‘ खिदमत – ए -खल्क समाजसेवा कमिटी आणि मुस्लीम को ऑपरेटिव्ह बँकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती ‘अवामी महाज ‘चे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांनी दिली. सकाळी ९ ते रात्री ९ वेळेत हे शिबीर होईल.
