‘आकार’ ची प्रवेश प्रक्रिया २८ रोजी

Share this News:

९ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांना संगीत, गायन, निवेदन क्षेत्रात प्रशिक्षण आणि व्यासपीठ

पुणे, दि. २३ – ‘आकार’ ही संस्था मुलांमध्ये साहित्य संगीत आदी कलांची गोडी लावण्यासाठी कार्यरत आहे. ‘आकार’ च्या कार्यक्रमामध्ये गायन, वादन, निवेदन सर्वकाही मुलांचेच असते. ‘आकार’ मधे ९ ते १६ या वयोगटातील नविन मुली आणि मुलांना गायन, वादन, आणि निवेदन यासाठीची प्रवेश प्रक्रिया या वर्षी २८ जानेवारी २०१८ रोजी आहे. अशी माहिती ‘आकार’च्या संस्थापक –सचिव चित्रा देशपांडे यांनी दिली.

देशपांडे म्हणाल्या की, गेल्या ४ वर्षांमध्ये ‘आकार’ चे क्षितिज विस्तारत आहे. अनेक ठिकाणी ‘ आकार’ च्या बालकलाकारांनी विविध विषयांवरचे कार्यक्रम सादर केले व जाणकारांचे कौतुक मिळवले. ‘स्वतंत्रते भगवती’ या स्वा. सावरकर यांच्या गीतांच्या कार्यक्रमाने तर विदेशातही झेंडा रोवला.

​प्रवेश प्रक्रियेला येताना मुलांनी गायन – शास्त्रीय रागातील १ बंदिश आणि सुगम संगीतातील १ गीत , वादन – शास्त्रीय वादनातील १ राग आणि तुमच्या आवडीची २ गाणी , निवेदन – तुमच्या आवडीचा परिच्छेद, त्याची तयारी आणि वेळेवर दिलेला परिच्छेद सादरीकरणाची तयारी असावी.. वादकांनी आपली वाद्ये आणणे आवश्यक. आणि १ पासपोर्ट साईज फोटो आणावा.

​ही प्रवेश प्रक्रिया : ​वसंत वैद्य विद्यालय, सचिन तेंडुलकर जॉगिंग ट्रॅक शेजारी, राजेंद्र नगर, पुणे. ४११०३० येथे सकाळी १०. ०० ते दुपारी १. ००​ या वेळेत होणार आहे.

या निवड प्रक्रीये नंतरचे प्रशिक्षण सशुल्क असून त्याचे माहिती प्रवेश परीक्षेच्या वेळी देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी चित्रा देशपांडे – ९८९००३३५२५, चैतन्य – ८४४६९७९९६८ यांच्याशी संपर्क साधावा किंवा www.facebook.com/AAKARCONNECT www.instagram.com/aakarconnect या संकेतस्थळांना भेट द्यावी असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.