ऊर्जामंत्री ना. बावनकुळे यांच्याहस्ते शुक्रवारी 132 केव्ही उपकेंद्राचे उद्‌घाटन

Share this News:

पुणे, दि. 17 : महापारेषणच्या पिंपळगाव 132/33 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचे (ता. आंबेगाव) उद्‌घाटन शुक्रवारी (दि. 21) राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते होणार आहे. तसेच शिरुर व आंबेगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधींसमवेत ते बैठक घेणार आहेत.

ऊर्जामंत्री ना. श्री. बावनकुळे शुक्रवारी (दि. 21) सकाळी 9 वाजता शिरुर तालुक्यातील ऊर्जाविषयक समस्यांबाबत लोकप्रतिनिधींसोबत शिरूर येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेणार आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता आंबेगाव तालुक्यातील महापारेषणच्या पिंपळगाव (खडकी) 132/33 केव्ही उपकेंद्राचे उद्‌घाटन ना. श्री. बावनकुळे यांच्याहस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार श्री. दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. विश्वासराव देवकते, उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. सुमारे 27 कोटींच्या खर्चातून महापारेषणच्या या उपकेंद्राची व पारेषण वाहिन्यांची उभारणी पूर्ण झाली आहे. या नवीन उपकेंद्रामुळे आंबेगाव तालुका व परिसराला सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा होणार आहे. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता आंबेगाव तालुक्यातील ऊर्जाविषयक समस्यांबाबत घोडेगाव पंचायत समितीच्या सभागृहात ना. श्री. बावनकुळे हे लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेणार आहेत.