ग्राहकांच्या सन्मानाने राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न
ग्राहक संरक्षण कायदे नागरिकांच्या फायद्याचेच आहेत. मात्र, राज्य सरकारची अंमलबजावणीसाठीची यंत्रणा आणि ग्राहकांची मानसिकता दोन्ही उदासीन आहेत. मुळात ग्राहकांनी जागृत राहण्याची गरज आहे. कायद्यातील अनेक संरक्षणात्मक बाबींची ग्राहकांना माहितीच नसते, हे चित्र बदलायला हवे. ग्राहक चळवळ केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती दैनदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनायला हवी असे मत ग्राहक पंचायत कार्याध्यक्ष सुर्याकांतजी पाठक यांनी व्यक्त केले. ग्राहक संरक्षण संस्थेतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्यायाविरुद्ध लढणार्या श्रीकांत येरुळे, राजेश शेंडे आणि नारायण खाटपे या जागृत ग्राहकांचा सन्मान करण्यात आला.श्रीकांत येरुळे यांनीबँके विरुद्ध, मोबाईलकंपनी विरुद्ध राजेश शेंडे यांनी तर बांधकाम व्यावसायिका विरुद्ध नारायण खाट्पेयांनी कायदेशीर मार्गाने न्याय मिळवला त्याबद्दल त्यांचा सन्मान ग्राहक पंचायत कार्याध्यक्ष आणि व्यावसायिक सूर्यकांत पाठक,माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे शिरीष फडतरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागरशिंदे, उपाध्यक्ष सुरेश पंडित, सचिव मनीषा बोरसे यांच्यासहसंस्थेचे पदाधिकारी आणि ग्राहकमोठ्या संखेने उपस्थित होते. .
विवेक वेलणकर म्हणाले, प्रत्येक प्रवासी नागरिक हा ग्राहकच आहे, पूर्वी प्रवाशांची लुटमार करणार्या पेंढारी लोकांच्या टोळ्या होत्या. आता हे सक्तीची टोलवसुली करणारे लुटमार आहेत. आरआयबीचे नियम वेबसाईटवर आहेत, ते प्रत्येकाने पडताळून पाहावे. कोणतेही सरकार कधीच नागरिकांसाठी तळमळीने लढत नाही. त्यामुळे ग्राहकालाच विरोधी पक्षात बसण्याची वेळ आली आहे. तरी राज्य सरकारने पुण्य कमवावे आणि मुंबई-पुणे महामार्गावरील टोल कायमचा बंद करावा, अशी मागणीही त्यांनी केली. .शिरीष फडतरे म्हणाले, ग्राहक अनेकदा कायद्यांतर्गत तक्रारी करतात, मात्र पाठपुरावा करीत नाही. ग्राहकांनी चिकाटी सोडू नये. अनेकांना तर ग्राहक संरक्षण कायदेच माहीत नसतात, याचा फायदा सेवा देणार्या कंपन्या घेतात. कोणतीही गोष्टी नीट पारखूनच घ्यावी. सागर शिंदे म्हणाले कि, ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या होणारी फसवणुकी बद्दल न्याय मिळवून देणे फसवणूक होऊ नेये यासाठी मार्गदर्शन आणि जनजगृती केली जाते. त्यामुळे ग्राहक नेहमी सुरक्षित राहील. प्रास्ताविक वैभव कुलकर्णी यांनी आणि राजीव पाटील यांनी आभार मानले.
