दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) पुणे केंद्र हीरकमहोत्सवी वर्ष

Share this News:

दि इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) हि भारतातीलच नव्हे तर जगातील अभियंत्यांची मोठी संघटना अभियांत्रिकी क्षेत्रातील १५ शाखाशी निगडित काम करीत आहे . हि मूळ संस्था १९२० साली स्थापन झाली असून तिला ब्रिटिश कारभारानुसार सन १९३५ साली राजमान्यता मिळाली आहे . या संस्थेचे मुख्यालय कोलकत्ता येथे आहे .

पुणे केंद्राची स्थापना सन १९५८ साली झाली . तोपर्यंत भारतातील फक्त राज्याच्या राजधानीमध्येच केंद्र असे . पुणे केंद्राचे सुमारे २३००० हुन अधिक सभासद असून सर्वच बाबतीत पुणे केंद्र अग्रेसर आहे . या संस्थेत विविध कार्यक्रम सतत सुरु असतात , त्यामध्ये सभासदाबरोबरच सर्व थरांचे प्रबोधन करणे हे महत्त्वाचे काम चालते . या संस्थेत नद्या जोड प्रकल्पासारखे काम करणारे जल व जलस्रोत विषयांशी निगडित एक स्वतंत्र उपविभाग असून अशाच पद्धतीचा ऊर्जा विषयाशी निगडित एक विभाग कार्यरत आहे . त्याचप्रमाणे जनसामान्यांमध्ये गुणवत्ता व सुरक्षा विषयक जागृती करणारा , स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारा आणि महिलांसाठी काम करणारा असे उपविभाग आहेत . पुणे केंद्रात १०००० हुन अधिक तांत्रिक पुस्तके असलेले सुसज्ज ग्रंथालय ,अभ्यासिका आदी सुविधा अभियंता नसलेल्यासाठी देखील उपलब्ध आहे . संस्थेतर्फे तांत्रिक व नावीन्यपूर्णे अभियांत्रिकीशी कामे करणाऱ्या अभियंत्यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते .

अभियांत्रिकी विषयी व्याख्याने ,चर्चासत्रे , कार्यशाळा , परिसंवाद आदी उपक्रम संस्थेमध्ये सातत्याने सुरु असतात. सर्वच कार्यक्रम निरपेक्ष वृत्तीने आयोजित करण्यात येतात . सेवाभावी अभियंत्याच्या मदतीने संस्थेने यशाची अनेक शिखरे गाठली . त्यामुळे भारतातील सर्व केंद्रामध्ये सर्वोत्तम स्थानिक केंद्र हा पुरस्कार अनेक वेळा मिळालेला आहे .

या केंद्राचे अध्यक्षपद भूषविलेले पदाधिकारी यांनी राष्ट्रीय स्तरावर उपाध्यक्ष होण्याचा मान मिळविला . या दोन व्यक्ती म्हणजे अविनाश सुर्वे व विजय घोगरे हे होत . पुणे केंद्राच्या अध्यक्षपदी डॉ. गिरीश मुंदडा हे असून मानद सचिव अविनाश निघोजकर हे काम पाहतात . या पूर्वी डॉ. व्ही. व्ही . जोगळेकर , डॉ. एम. व्ही. देशपांडे ., ब्रिगेडियर एन. बी. ग्रांट , बी. जी. शिर्के , एच. के. फिरोदिया आदी मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्षपद भूषविले आहे .

संस्थेने गेल्या ५९ वर्षात भरीव व लोकोपयोगी कामे केली असून अशा या संस्थेचा हीरकमहोत्सवी शुभारंभ सुरु होत आहे .