पुणे महानगरपालिकेचे बंडगार्डन विभागाच्या पाणीपुरवठा विभागातील सहाय्यक अभियंता विनायक पांडुरंग जांभुळकर यांचे अल्पशा आजाराने निधन

Share this News:

वानवडी गाव येथे राहणारे पुणे महानगरपालिकेचे बंडगार्डन विभागाच्या पाणीपुरवठा विभागातील सहाय्यक अभियंता विनायक पांडुरंग जांभुळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले . ते ५१ वर्षांचे होते . त्यांच्यामागे आई , पत्नी , एक मुलगा , दोन मुली असा परिवार आहे . त्यांनी पुणे स्टेशनसमोरील भुयारी मार्ग , वाहनतळ , पुणे – सोलापूर रोड आणि पुणे नगर रोडवरील बी. आर. टी. मार्ग बनविण्यासाठी त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते .

त्यांच्यावर वानवडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . त्यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , नगरसेवक प्रशांत जगताप , नगरसेवक धनराज घोगरे , नगरसेविका कालिंदी पुंडे ,माजी नगरसेवक शिवाजी केदारी , पुणे महानगरपालिकेचे अभियंता वर्ग व वानवडी हडपसर भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .