पुणे शहरात बुधवारी व गुरुवारी महावितरणचे ग्राहक संपर्क अभियान

Share this News:

पुणे, दि. 17 : वीजग्राहकांच्या विविध प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी पुणे शहरातील महावितरणच्या विविध उपविभागांत ग्राहक संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

वीजग्राहकांसाठी नवीन वीजजोडणी, नावात बदल, पत्त्यात बदल, वीजभार आदींसाठी अर्ज मंजुरी तसेच वीजबिल दुरुस्ती, मीटर बदलण्यासह इतर तक्रारी सोडविण्यासाठी पुणे परिमंडलात महावितरण ग्राहक संपर्क अभियानास सुरवात झालेली आहे. बुधवारी (दि. 19) पेशवे पार्क, मार्केटयार्ड, धनकवडी, फायर ब्रिगेड, रास्तापेठ, विश्रांतवाडी व वाडिया उपविभाग कार्यालयांत तर गुरुवारी (दि. 20) स्वारगेट व कसबा पेठ उपविभाग कार्यालयांत सकाळी 11 वाजता या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. वीजग्राहकांनी या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.