महावितरणच्या संचालक (वाणिज्य) पदी श्री. सतीश चव्हाण यांची नियुक्ती
मुंबई, दि. 22 जानेवारी 2018 :
महावितरणच्या संचालक (वाणिज्य) या पदावर श्री. सतीशचव्हाण यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली असून महावितरणमुख्यालयातील प्रकाशगड मुंबई येथील सांघिक कार्यालयात ते यापूर्वीकार्यकारी संचालक (वाणिज्य) म्हणून कार्यरत होते.
मुळचे नांदेड येथील रहिवाशी असलेले श्री सतीश चव्हाण यांनीऔरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून 1987मध्ये विद्युत अभियांत्रिकीची पदवी संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनीसुमारे 14 वर्षे भारतासह दक्षिण कोरिया व बांगला देशातील विविधस्टील उद्योगात महत्वपूर्ण पदावर काम केले. तसेच त्यांनी महापारेषणकंपनीतील 400 किव्हो व अतिउच्चदाब बांधकाम विभागात उपकेंद्रव वाहिनी उभारणीच्या कामाची जबाबदारी सुमारे 7 वर्षे सांभाळली.
2009 साली त्यांची महावितरणमध्ये सरळसेवा भरतीनेअधीक्षक अभियंता पदावर निवड झाली. या पदावर त्यांनी 5 वर्षेकाम केले. त्यापैकी व्यवस्थापकीय संचालक यांचे विशेषकार्यअधिकारी म्हणून सुमारे 2 वर्षे उत्कृष्टरित्या काम केले. याशिवायते भार व्यवस्थापन, मुंबई व पुणे चांचणी विभागातही कार्यरत होते.त्यानंतर सतिश चव्हाण यांची पदोन्नतीद्वारे मुख्य अभियंतापदी म्हणूननिवड झाली. औरंगाबाद परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरतअसताना त्यांनी ग्राहकसेवा सुधारण्यात भरीव कामगिरी केली आहे.
महावितरणमधील महत्वाच्या असलेल्या कार्यकारी संचालक(वाणिज्य) या पदावर त्यांनी दीड वर्षे काम केले. त्यांच्या कामाचीदखल घेऊन श्री सतिश चव्हाण यांची संचालक (वाणिज्य) यामहत्वाच्या पदावर पदस्थापना करण्यात आली आहे.
