महोत्सवा निमित्त ‘आधारवड’ या पुस्तकाचे प्रकाशन

अमृतमहोत्सवा
Share this News:

मुंबई – दि.12 डिसेंबर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांच्या अमृत महोत्सवा निमित्त ‘आधारवड’ या पाच भाषांमधील चित्र पुस्तकाचे प्रकाशन आज वरळी येथील नेहरु सेंटरच्या सभागृहात विविध राजकीय, सामाजिक, कला, क्रिडा, नाट्य, दिग्दर्शन, तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी यांच्या हस्ते अमृतमहोत्सवा निमित्त खा.शरदचंद्रजी पवार व प्रतिभाताई पवार यांच्या सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, महसुलमंत्री एकनाथ खडसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे, उद्योगपती मुकेश अंबानी यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या भागात खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. तर कार्यक्रमाच्या उत्तराधार्थ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, नारायण राणे, ज्येष्ठ संगणक तज्ञ विजय भटकर, दिग्दर्शन डॉ.जब्बार पटेल, प्रसिध्द उद्योगपती राहूल बजाज, ज्येष्ठ लेखक मधु मंगेश कर्णिक,ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर, माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे त्यांचे अभिष्ट चिंतन केले.

या प्रसंगी राज्याच्या मंत्रीमंडळातील अन्न न नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट, जलसंपदामंत्री गिरीष महाजन, सहकारमंत्री चंद्रकात पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे आदीसह ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, सचिन पिळगावकर,विजू खोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमातील मान्यवरांचे स्वागत प्रदेशाध्यक्ष आ.सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते खा.प्रफुल पटेल,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अभिनेते सुनील बर्वे व सचिन खेडेकर यांनी केले.तर उपस्थित मान्यवरांचे आभार मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केले.