राज्यातील सुमारे अडीच लाख घरांना २ हजार वाड्यापाड्याना डिसेंबर २०१८पर्यन्त वीजजोडणी

Share this News:

मुंबई, दि. ०८ मे, २०१८ :-राज्यातील सर्वच ४१ हजार ९२८ गावांचे, ९८ हजार ३५६वाड्यापाड्यांचे तसेच ग्रामीण भागातील सुमारे कोटी ३७ लाख ९२हजार घरांचे विद्युतीकरण झाले असून उर्वरित वाड्यापाड्यात घरांना सौभाग्य योजना तसेच दिनदयाल उपायध्याय योजनेतूनडिसेंबर २०१८ पर्यन्त वीज देण्याचे काम वेगात सुरू आहे.

राज्यात ग्रामीण भागातील घरांची संख्या सुमारे कोटी ४०लाख २६ हजार ३५३ आहे. त्यापैकी कोटी ३७ लाख ९२ हजार१२५ घरात यापूर्वीच वीज पोहोचली आहे. हे प्रमाण ९८.३३ टक्केएवढे आहे. उर्वरित लाख ३४ हजार २२८ घरांत सौभाग्य दिनदयाल योजनेंतर्गत वीजजोडणी देण्यात येणार असून याबाबतचीकामे मोठ्या प्रमाणात सूरू आहेत.
मार्च २०१८ अखेर राज्यातील गावांची संख्या ४१ हजार९२८ असून महावितरणने या सर्व गावांत वीज पोहोचविली आहे. यात२०१८ मध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या १११ गावांचाहीसमावेश आहे.
सद्यस्थितीत राज्यातील वाड्यापाड्यांची संख्या सुमारे लाख हजार ९३९ एवढी आहे. त्यापैकी ९८ हजार ३५६वाड्यापाड्यात यापूर्वीच वीजजोडणी देण्यात आली असून उर्वरित हजार ७०४ वाड्यापाड्यांना सौभाग्य योजनेतून, २३२वाड्यापाड्यांना दिनदयाल योजनेतून ३४७ वाड्यापाड्यांनास्थानिक विकास निधीतून डिसेंबर २०१८ पर्यन्त वीजजोडणी देण्यातयेणार आहे. ज्या ठिकाणी वीजजोडणीसाठी पायाभूत सुविधांचीगरज आहे, अशा ठिकाणी विविध योजनेंतून निधी मिळवून तसेचदुर्गम भागात महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकारण (मेडा) द्वारेवीजजोडणी देण्यात येणार आहे.
राज्यात वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभघेण्यासाठी महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी त्वरीत संपर्कसाधावा किंवा 1912, 1800-102-3435 / 1800-233-3435 याटोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केलेआहे.