सरकारचे चुकीचे निर्णय मतदारांसमोर मांडण्यासाठी राष्ट्रवादी युवक पुढाकार घेतील…..संग्राम कोते पाटील

IMG-20180528-WA0004.jpg
Share this News:

पिंपरी (दि. 28 मे 2018) केंद्र व राज्यातील भाजपा आघाडीच्या सरकारने मागील चार वर्षात घेतलेले चुकीचे निर्णय मतदारांसमोर मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे युवक पुढाकार घेतील. राष्ट्रवादीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील निवडणूकीत भाजपा सेनेला घरी बसवणे हेच एककलमी ध्येय ठेवून राज्यभर माजी उपमुख्यमंत्री अजितदाद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली जनजागृती करण्यात येईल. असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी चिंचवड येथे केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या अध्यक्षतेखाली चिंचवड येथील ॲटो क्लस्टर सभागृहात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक निलेश पांढारकर, प्रवक्ते फजल शेख, रविकांत वरपे, संदीप चिंचवडे, विशाल काळभोर, लाला चिंचवडे, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, गंगा धेंडे उपस्थित होते.
कोते पाटील म्हणाले, भाजपा सेनेच्या आघाडी सरकारमुळे महाराष्ट्राची सर्व क्षेत्रात पिछेहाट झाली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले लाखों युवक, युवती, बेरोजगार आहेत. त्यांच्या मनातील सरकारच्या विरोधातील तीव्र भावना पुढील निवडणूकीतील ते मतपेठीतून व्यक्त करतील. महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी शेती, उद्योग, शिक्षण, व्यापार, रोजगार क्षेत्रात पुन्हा राज्याला प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन होणे आवशक आहे. यासाठी राष्ट्रवादीच्या युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन कोते पाटील यांनी यावेळी केले. वाकडकर म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मागील वर्षात एक हाती सत्ता भाजपाला मिळाली आहे. त्यांचेच राज्य व केंद्रात सरकार आहे. तरी देखील स्थानिक पातळीसह राज्य व केंद्रातील एकही प्रश्न भाजप सेनेला सोडविता आला नाही. अनधिकृत बांधकामांना पायबंद घालण्याऐवजी मागील त्यामध्ये दुप्पटीहून जास्त वाढ झाली आहे. नागरिकांना मनपामधून प्राथमिक स्तरावरील सेवासुविधा मिळत नाहीत. तर दुसरीकडे मिळकत करात पाणीपट्टीत वाढ केली आहे. शहरातील 70 टक्के भागात विस्कळीत पाणीपुरवठ्यामुळे महिला, भगिनी त्रस्त आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसने मागील पंधरा वर्षात शहरातील विकासप्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी केली. आता त्याच विकासप्रकल्पांची उद्‌घाटने करण्यात भाजपाचे पदाधिकारी स्वत:ला धन्यता मानत आहेत. अशी टिका वाकडकर यांनी केली.
यावेळी कोते पाटील व वाघेरे पाटील यांच्या हस्ते नविन युवक पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यामध्ये युवक उपाध्यक्ष किरण पवार, रुपेश मोरे, प्रशांत सपकाळ, सागर सुतार, पंकज चोपदार, ऋषिकेश तापकीर, विकास शेट्टी, सौरव घुले, श्रीकांत काटे, संदीप तरस, सचिन राऊत, विनायक काळभोर आणि सरचिटणीस नितिन कांबळे, अमित नांगरे, सचिन राऊत, स्वप्निल तापकीर, संदीप अडसूळ, महेश चौधरी, हर्षद म्हेत्रे, महेश माने, गणेश फुंडे, रमणदिपसिंग कोहली, असिफ शेख संघटक आकाश जाधव, मंगेश असवले, महेश किवळे, तुषार सोनवणे, शादाब खान, सोशल मिडिया सरचिटणीस शिवराज रणवरे, रोहीत कदम, सौरभ साकोरे, संकेत दागट तसेच चिंचवड विधानसभा सरचिटणीस किशोर पाटोळे, काशिनाथ तेलंग (दाताळकर), समीर साबळे, संघटक अभिलाष कांबळे, उपाध्यक्ष राहूल अंबवले यांची निवड करण्यात आली.

स्वागत, प्रास्ताविक विशाल वाकडकर, सुत्रसंचालन दिपक साकोरे आणि आभार विशाल काळभोर यांनी मानले.