थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरु

Share this News:

पुणे, दि. 25 : पुणे परिमंडलातील पुणे व पिंपरी चिंचवड शहर तसेच मंचर, राजगुरुनगर व मुळशी विभागातील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची नियमित मोहीम सुरु असून या आठवभरात या मोहिमेला आणखी वेग देण्यात येणार आहे.

सद्यस्थितीत महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यात येत आहे. चालू देयकांची मुदत संपुष्टात आल्यानंतरही देयकाच्या रकमेचा भरणा न केलेल्या वीजग्राहकांकडे महावितरणचा पाठपुरावा सुरु आहे. ज्या वीजग्राहकांनी मुदत संपल्यानंतरही चालू देयकाचा भरणा केलेला नाही त्यांच्याकडे जाऊन देयकाची रक्कम भरण्याची विनंती जनमित्रांकडून करण्यात येत आहे. याशिवाय मुदतीत देयकाची रक्कम न भरल्याने संबंधीत ग्राहकांना नोटीस देण्यात येत आहे.

वीजग्राहकांना मुदतीत चालू देयकांचा तसेच थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या अधिकृत वीजबील भरणा केंद्गांसह .. हे संकेतस्थळ आणि मोबाईल अ‍ॅपची सुविधा उपलब्ध आहे.

वीजग्राहकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी त्वरीत चालू देयकांचा मुदतीत व मागील महिन्यांतील थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. वीजग्राहकांना वीजदेयकांबाबत काही तक्रार असल्यास महावितरणच्या संबंधीत कार्यालयाशी संपर्क साधल्यास तक्रारींचे निवारण करण्यात येईल.