अखेर JSPM संस्थेचे संस्थाचालक व PVPIT महाविद्यालयांच्या प्राचार्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Share this News:

गेल्या २ दिवसापासून JSPM चे संस्थाचालक व PVPIT महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यावर अभाविप (अखिल भारतीय विद्यार्थी परिषद) चे कार्यकर्ते गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते व तसा रीतसर अर्ज हिंजेवाडी पोलीस स्टेशन येथे देण्यात आला होता. शेवटी आज पोलीस प्रशासनाने संबंधित प्राचार्य व संस्थाचालक यांच्या विरोधात भारतीय दंड सहितेच्या कलम ४०६(अपहार) ४२०(फसवणूक) आणि ५०६(धमकावणे) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

JSPM संस्थेच्या पुण्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयात शासनाद्वारे दिलेली EBC शिष्यवृत्ती येवून ४ महिने उलटून गेल्यावरही अद्यापपर्यंत ती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली नाही याउपर महाविद्यालयांकडून शिष्वृत्ती आल्यावर ३-४ दिवसात पैसे देतो असे सांगून विद्यार्थ्यांकडून पैसे मिळाले आहेत अशा आशयाच्या मजकुरावर सह्या घेण्यात आल्या आहेत. पैसे मागण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना वारंवार शिवीगाळ करण्यात आली आहे. JSPM च्या सर्व महाविद्यालयातील एकूण EBC धारकांची संख्या पाहता हा किमान १० करोड रुपयांचा भ्रष्टाचार आहे. यात सरळ सरळ अपहार व फसवणूक करण्यात आलेली आहे.

तरी त्या नुसार संस्थाचालक व प्राचार्य यांच्यावर आज अभाविप कार्यकर्ते व संबंधित विद्यार्थ्यांनी भारतीय दंड सहितेच्या कलम ४०६(अपहार) ४२०(फसवणूक) आणि ५०६(धमकावणे) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. तरी या प्रकरणाची महाराष्ट्र शासनाने गंभीर दाखल घ्यावी व अश्या संस्थाचालक व प्राचार्यांवर कडक कार्यवाही करावी. अश्या प्रवृत्तीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याचा अधिकार नाही तरी शासनांनी त्वरित त्यांना अटक करावी व त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. आणि येणाऱ्या काळात अशी विद्यार्थ्यांची फसवणूक होणार नाही याकरिता शासनाने अश्या संस्था वर प्रशासकीय अधिकारी नेमावा. अश्या प्रकारच्या संस्थांची चौकशी करावी जेणेकरून कोणतीही शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांची फसवणूक करणार नाही. असे न झाल्यास अभाविप महाराष्ट्रभर या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन करेल असा इशारा पुणे महानगर मंत्री प्रदीप गावडे यांनी पत्रकार परिषेद दिला .