” वृंदावन ” चित्रपटाचा एक हजार विशेष मुलांनी चित्रपटाचा लुटला आनंद

Share this News:

गुढीपाडव्यानिमित मनजितसिंग विरदी फाऊडेशनच्यावतीने मराठी चित्रपट

गुढीपाडव्यानिमित मनजितसिंग विरदी फाऊडेशनच्यावतीने मराठी चित्रपट ” वृंदावन ” चित्रपटाचा एक हजार विशेष मुलांनी चित्रपटाचा  आनंद  लुटला.  या मोफत  शो मध्ये मतिमंद , अपंग , अनाथ , बहुविकलांग त्याचप्रमाणे कॅन्सरग्रस्त लहान एक हजार विशेष मुले सहभागी झाले होते .   बंडगार्डन रोडवरील आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये दाखविण्यात आला .या कार्यक्रमाचे  संयोजन  मनजितसिंग विरदी फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनजितसिंग विरदी  यांनी केले होते .

गुढीपाडवा मराठी नववर्षाची सुरुवात त्यासाठी मनजितसिंग विरदी फाऊडेशनच्यावतीने  प्रसिध्द मराठी चित्रपट अभिनेता राकेश बापट , मराठी अभिनेत्री पूजा सावंत आणि वैदेही परशुरामी यांचा अभिनय असलेला  यंदा मराठी चित्रपट ” वृंदावन ” चित्रपट एक हजार विशेष मुलांसाठी मोफत शो चे आयोजन केले होते . यंदा शोचे १८ वे वर्ष होते  . या शो मध्ये विशेष मुलांना भेटवस्तू , खेळणी , कपडे , खाऊ , पॉपकॉर्न , वेफर्स , , पाणी , चॉकलेट आदी खाऊ देण्यात आला  .

    यावेळी प्रसिध्द मराठी चित्रपट अभिनेता राकेश बापट , मनजितसिंग विरदी , स्मृती कपूर , अरविंद बुधानी , माजी आमदार मोहन जोशी , संजय दळवी , जयसिंग भोसले ,  डॉ. भगवान यादव , चित्रपटाचे निर्माते  राजप्रेमी , संदीप शर्मा , सुनील खांदपुरकर आदी मान्यवर उपस्थित होते .

 या कार्यक्रमाच्या संयोजन मनप्रितसिंग विरदी , मनमितसिंग विरदी , रिदिमा विरदी , हरभजनकौर विरदी , सहेर विरदी , करणसिंग गिल , कुणालसिंग गिल , मेजरसिंग कलेर , सलमान शेख , सुरज अग्रवाल , विजय काणगे , किरणजित गिल , रोहित राठोड , सोमनाथ माने , आशा डिसोझा आदींनी विशेष परिश्रम घेतले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परवेझ सय्यद यांनी केले . यावेळी मनप्रितसिंग विरदी यांचा आयनॉक्स मल्टीप्लेक्सतर्फे स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .

     या शो मध्ये केअर इंडिया , सेंट मार्गारेट शाळा , महावीर निवासी मतिमंद विद्यालय , तैयबिया ओरफनेज , संतुलन , वेदप्रकाश गोयल निवासी , अयोध्या चेरिटेबल ट्रस्ट , रिदम डान्स अकादमी , सेवाधाम मतिमंद निवासी , टाक ऑरगनायझेशन , कायाकल्प , महादजी शिंदे हायस्कूल , अक्षरपाऊल , जो किड्स क्लब , संतवाना आदी सामाजिक संस्थामधील विशेष मुले सहभागी झाली होती . मनजितसिंग विरदी फाऊडेशन गेली १८ वर्ष विशेष मुलासाठी सामाजिक कार्यात अग्रसरपणे कार्य करीत आहे . या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दक्षिनात्य दिग्दर्शक टी एल व्ही प्रसाद यांनी केले आहे .

  यावेळी प्रसिध्द मराठी चित्रपट अभिनेता राकेश बापट यांनी सांगितले कि , आतापर्यंत मी खूप काम केले परंतु मनजितसिंग विरदी फाऊडेशनचे विशेष मुलासाठी काम पाहून मी भारावून गेलो आहे . त्यांच्या पुढील सामाजिक कारकीर्दीस शुभेछा .

  यावेळी  मनजितसिंग विरदी फाऊडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनजितसिंग विरदी   यांनी सागितले कि , गेली १८ वर्षापासून आपली संस्था सामाजिक कार्यात अग्रेसरपणे काम करीत आहे . यंदा प्रथमच मराठी चित्रपट  गुढीपाडवानिमित विशेष मुलासाठी दाखविण्यात आला