297 कोटी रूपयांच्या घोटाळ्या प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवु-ना.धनंजय मुंडे
ना.मुंडे हे आज मोहोळ नगर पंचायतीच्या प्रचारासाठी तसेच अकलुज येथे मोहिते पाटील यांच्या कुटुंबियांच्या सांत्वन भेटीसाठी सोलापुर जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. सार्वजनिक आरोग्य विभागातील उघडकीस आलेल्या 297 कोटी रूपयांच्या घोटाळ्या प्रकरणी बोलतांना ते म्हणाले की, माध्यामांमधुन या घोटाळ्या संबंधी येत असलेल्या बातम्यांपेक्षा हा मोठा घोटाळा असुन तो आपण याच आठवड्यात सभागृहात पुराव्यासह उघड करू. जुलै अधिवेशनातही आपण सार्वजनिक आरोग्य विभागतील औषध घोटाळ्या प्रकरणी सभागृहात आवाज उठवला होता मात्र चिक्की घोटाळा असो की, डाळ घोटाळा महापुरूषांच्या फोटो खरेदीचा घोटाळा असो की, अग्निशमन यंत्राचा ! सरकार प्रत्येक घोटाळा पाठीशी घालत आहे. औषध खरेदी संचालक स्तरावर होत असेल, सर्व निर्णय खालच्या पातळीवर होतात असे सरकार तर्फे सांगितल्या जात असेल तर मग आरोग्य सचिवांनाच हे खाते चालवुद्या मंत्र्यांची गरजच काय ? असा सवाल उपस्थित करून डॉ.लहानें सारख्या लाखो रूग्णांना दृष्टी देणार्या पद्मश्रीप्राप्त व्यक्तीची निवृत्त न्यायाधिशां मार्फत चौकशी करण्याची सरकारची तयारी असते मग घोटाळ्यांची चौकशी करण्यासाठीच हे सरकार का घाबरत आहे.