अब्दुल कलाम आझाद यांचे नाव जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमात समावेश करा

Share this News:

>> भाजपचे प्रदेश सचिव अजीज शेख यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे नाव राज्य सरकारच्या जयंती व पुण्यतिथी कार्यकमांच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव अजीज शेख यांनी जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात अजीज शेख यांनी जिल्हाधिकारी राव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “मौलाना अब्दुल कलाम आझाद हे स्वातंत्र्य सैनिक, देशाचे पहिले शिक्षण मंत्री होते. त्यांना देशाच्या सर्वोत्तम भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे नाव राज्य सरकारच्या जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांच्या सूचीत २००८ पूर्वी समाविष्ट होते. परंतु, त्यांचे नाव मागील काँग्रेस आघाडी सरकारने २००८ मध्ये सूचीमधून वगळले आहे.

मौलाना अब्दुल कलाम आझाद यांचे नाव जयंती व पुण्यतिथी कार्यक्रमांच्या सूचीत समावेश करण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारला अनेकवेळा निवेदन देण्यात आले. परंतु, काँग्रेस आघाडी सरकारने त्याकडे फारसे गांभीर्याने न पाहता एका आदर्श मुस्लिम नेत्यावर व मुस्लिम समाजावर सतत अन्याय केला.

त्याबाबत मुस्लिम समाजामध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्यासारख्या महान मुस्लिम नेत्याचे नाव सरकारी पुण्यतिथी व जयंतीच्या सूचीत समावेश करून मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा.”