शासनाने छोट्या बँकांना अडचणीच्या काळात मदत करावी,रुपी बँकेस ही किमान तीनशे कोटी चे सहाय्य करावे – आ.गिरीश बापट .

Share this News:
महाराष्ट्रात दोन लाख तीस हजार सहकारी संस्था आहेत,त्यात पतसंस्था १५००० तर सहकारी बँका ६०० आहेत,यात जवळ पास ६ लाख कोटी ची वार्षिक उलाढाल  होते ,तर साडे पाच कोटी नागरिक कुठल्या न कुठल्या रूपाने सहकार चळवळी शी जोडले गेले आहेत,आणि म्हणूनच राज्य सरकार ने गेल्या १४/१५ महिन्यात सहकार चळवळ केवळ टिकावी असे नाही तर ती वाढावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.मात्र सहकारी क्षेत्राला वाव देत असताना कुठल्या ही गैरव्यवहाराला पाठीशी घालणार नाही किवा कोणाला सहकार क्षेत्र लुटू देणार नाही,असे स्पष्ट प्रतिपादन सहकार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.उद्यम विकास सहकारी बँकेच्या बिबवेवाडीतील सातव्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी बोलताना दादा म्हणाले “केवळ कर्ज देणे असे बँकेचे उद्दिष्ट्य असू नये तर तरुणांना उद्योगासाठी प्रेरित करणे व त्यासाठी कर्ज देणे असे बँकेने करावे,आज राज्यात ६०० सहकारी बँका असून त्यातील बर्याच बँका अडचणीत आहेत,अश्या परिस्थितीत उद्यम बँक वाढत आहे आणि त्याच्या सातव्या शाखेचे उद्घाटन होत आहे ही कौतुकास्पद बाब आहे असे ही ते म्हणाले.
यावेळी पालकमंत्री न.गिरीश बापट ,बँकेच्या संचालिका आ.माधुरीताई मिसळ,आ.भीमराव तपकीर,बँकेचे अध्यक्ष दिलीप उंबरकर,उपाध्यक्ष पांडुरंग कुलकर्णी,कार्यकारी संचालक निरंजन फडके,संचालक संदीप खर्डेकर,नगरसेवक राजेंद्र शिळीमकर,श्रीनाथ भिमाले,मानसी देशपांडे,कविता वैरागे,अस्मिता शिंदे,मनीषा चोरबेले,यांच्यासह बाबाशेथ मिसाळ, गोपाल चिंतल इ.मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी बँकेचे संचालक मनोज नायर,सीताराम खाडे,शंकर बरके,महेश लडकत,दिनेश गांधी,महेंद्र काळे,शिरीष कुलकर्णी,व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे उपस्थित होते.

मा.गिरीश बापट यांनी बँकेच्या संचालकांचे अभिनंदन करताना बँकेने समाजात विश्वासहार्यता वाढवली असल्याचे नमूद करून शुभेच्छा दिल्या.तसेच शासनाने रुपी बँकेसारख्या अडचणीत आलेल्या बँकांना पेकेज द्यावी अशी मागणी करतानाच याचा योग्य विचार करून लाखो खातेदार ठेवीदारांना न्याय द्यावा व बँकेस परत चांगले कामकाज करण्याची संधी द्यावी अशी आग्रही मागणी केली.
आ.माधुरी मिसाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले,तसेच आपल्या भाषणात त्यांनी कर्ज देताना अधिक काळजी घेण्याची व उद्योजकता वाढवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले.तसेच सहकारी बँका आणि छोटे उद्योजक यांना एका व्यासपीठावर आणून त्यांना मेक इन इंडिया साठी प्रेरित व प्रशिक्षित करावे.

बँकेचे अध्यक्ष दिलीप उंबरकर यांनी आपल्या प्रास्ताविकात बँकेच्या प्रगतीची माहिती दिली.
संदीप खर्डेकर यांनी सूत्र संचालन तर पांडुरंग कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.