पुणे, दि. २५  – राज्यात गोहत्या बंदी कायदा असताना जुन्नर तालुक्यातील बेल्हा येथे ४० गायींच्या कत्तलीचा डाव हिंदू आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उधळून लावला. 

Share this News:
 हिंदु आघाडीचे  शिवशंकर स्वामी, मिलिंद एकबोटे  यांनी बेल्हे येथील कसायांच्या गल्लीमध्ये १८० जनावरे  असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. मात्र, पोलीस घटनास्थळी उशिरा पोहचल्याने नागरिकांनी तेथील अनेक जनावरे दुसऱ्या जागी हलविली. मात्र, ४० गायी पोलिसांना मिळाल्या.
हिंदु आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ही जनावरे भोसरीतील गोशाळेत सोडण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांनी ही जनावरे ताब्यात घेतल्या नंतर दीड दिवस जुन्नर पोलीस ठाण्यासमोर उपाशी अवस्थेत ठेवली होती.
दरम्यान, हे प्रकरण जुन्नर न्यायालयात गेले. न्यायालयात पोलिसांनी जनावरे कसायांना द्यावी असा पवित्रा घेतला. त्यानंतर हिंदु आघाडीचे स्वामी व एकबोटे यांनी राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त विश्वासराव भोसले आणि भाजप गो विकास आघाडीचे अशोक जैन यांना यामध्ये मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यानुसार जैन व भोसले यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयामध्ये जनावरे गोशाळेतच ठेवावी असे मत मांडले. त्यावर न्यायालयाने गायी गोशाळेत ठेवण्याचा निकाल दिला. हिंदु आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी  ४० गायी भोसरी येथील गोशाळेत ठेवल्या. हिंदू आघाडीच्या कार्यकर्त्यांमुळे ४० गायींना कत्तलीपासून जीवनदान मिळाले.