सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

Share this News:

पुणे : ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वाघोली येथील ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्ताने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.महाविद्यालयातील महिला प्रद्यापिका व महिला कर्मचाऱ्यांनी वेळी सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा आढावा घेतला.त्यांच्या योगदानामुळेच आज महिला सर्वच क्षेत्रात अव्वल असल्याने त्यांच्या कार्याप्रती वेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाचे व्यवस्थापक प्रा.प्रकाश माळी यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले ते म्हणाले कि सावित्रींचा वसा व वारसा आपण जोपासायला हवा त्यांचे कार्य त्यांचे चरित्र आचरण महिलेला खऱ्या अर्थाने स्त्री म्हणून घडवू शकते.

यावेळी या वेळी संस्थेचे चेअरमन सागर ढोले पाटील,प्राचार्य डॉ.सतीश आल्लमपल्लेवार,उप प्राचार्य अभिजीत दंडवते,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.