महिलांना शनी मंदिरातील चौथऱ्यावर प्रवेश देऊ नये ही तर सरकारचीच इच्छा.

Share this News:

– विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप

मुंबई – दि.4 : उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही शनी शिंगणापूरला दर्शनासाठी गेलेल्या महिलांना न्यायलयाच्या निकालाची प्रत विचारली जाते. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी शनी शिंगणापूरला होत नाही, हा न्यायालयाचा अवमान असून सर्व कामकाज बाजूला ठेऊन याबाबत चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली.


नियम २८९ द्वारे चर्चेचा प्रस्ताव त्यांनी सभागृहात दिला. राज्य सरकारने महिलांच्या मंदिर प्रवेशाबाबत उच्च न्यायालयात हमी घेतली. त्यानंतर कोर्टाने समानतेच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले. पण तरीही निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, यावरुन  शनी मंदिरातील चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा अशी सरकारचीच इच्छा नसल्याचे  स्पष्ट होते, असा आरोप मुंडे यांनी केला.