‘आदित्य प्रतिष्ठान’चा ‘लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार’ पंडित जसराज यांना अर्पण

Share this News:

पुणे, दि. 9 एप्रिल : आदित्य प्रतिष्ठानच्या ३३ व्या वर्दापनदिनानिमित्त विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या हस्ते पं. जसराज यांना लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सव्वा लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

पुरस्कार वितरणानंतर शंकर अभ्यंकर यांनी पं. जसराज यांच्याशी संवाद साधला, तसेच पुरस्कारांमागील भूमिकाही विशद केली. अभ्यंकर यांनी अनुवादित केलेल्या ‘गीतासागर’च्या ११ व्या आवृत्तीचे आणि ‘मुलांसाठी पाठ’ या पुस्तिकेचे प्रकाशन पं. जसराज यांच्या हस्ते झाले. उत्तरार्धात पं. जसराज यांचे शिष्य संजीव अभ्यंकर यांच्या गायनाची मैफल झाली.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय गायक पंडित जसराज यांना आदित्य प्रतिष्ठानतर्फे “लक्ष्मी-वासुदेव कलाभूषण पुरस्कारा‘ने शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. या वेळी झालेल्या मुलाखतीत जसराज यांनी ही हृद्य आठवण उपस्थितांपुढे उलगडली. विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर व त्यांचे कुटुंबीय या वेळी उपस्थित होते.

पंडिज जसराजजी आणि विद्यावाच्यस्पती शंकर अभ्यंकर यांच्या संवादातील काही मुद्दे  –

 • हैदराबादमध्ये फुटपाथवर जे ऐकलं, तीच माझी शाळा!
  जसराज म्हणाले, ‘संगीतात काही तरी आश्वासक सुरवात व्हावी, अशी संधी असतानाच माझ्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आमचे सगळे आयुष्यच बदलून गेले. मग खडतर प्रवास सुरू झाला. अशात, हैदराबादमध्ये असताना एका कॅंटीनच्या जवळच्या फुटपाथवर बसल्या बसल्या मला कधीतरी अख्तरीबाई (बेगम अख्तर) यांचे गाणे रेडिओवर ऐकायला मिळायचे. तेच ऐकत पहिले शिक्षण झाले. तीच माझी शाळा होती.‘‘
 • मला तबलावादक व्हायचं होतं, पण…
  मी तबलाही शिकलो आहे. मला मोठं होऊन तबलावादकच व्हायचे होते. मात्र, एका घटनेने मला तबल्यापासून दूर नेले. एका मैफलीत मी तबला वाजवणार होतो. तिथे मला एका ज्येष्ठ गायकाने “तबलजींनी गायकासोबत मंचावर बसून नव्हे, खाली बसून साथ द्यावी‘, असे सुनावले होते. त्यामुळे मी दुखावला गेलो आणि या पुढे तबला न वाजवण्याचा निर्धार केला, असे जसराज यांनी सांगितले.
 •        ‘दस गजकी तान मारनेवाले बहोत है, तुम्हारे गलेमें भगवान है’ असे सनईसम्राट उस्ताद बिस्मिल्ला खाँ आणि ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बालक्ष्मी यांनी सांगितले होते. त्यांचे म्हणणे खरे करण्याची जबाबदारी भगवंताला घ्यावी लागते, अशा विनयपूर्वक भावना पं. जसराज यांनी व्यक्त केली.
 •        सन्मान सर्वात मोठी गोष्ठ आहे त्यामुळेच त्याला सन्मान असे म्हणतात.
 • उस्ताद बिस्मिल्ला खान पुन्हा जन्मने अशक्य.
 • पुण्यातील प्रेक्षकांसमोर बोलणे मोठ कठीण काम आहे, पुण्यात एकाहून एक विद्वान आहेत.
 • पुणे हि भारताची सांस्कृतिक राजधानी आहे.
 • मी चार वर्षाचा होतो तेंव्हा वडीलांनी सांगितले होते कि, पुण्याने ज्याच ऐकलं त्याला जगाने मानलं… पुणेकरांनी मान्य किंवा स्विकारलं नाही पण फक्त ऐकलं तरी जग त्याला मानतं…
 • जे वय किराणा घराण्याचं तेच वय मेवाती घराण्याचं आहे.
 • हरियाणात लोक संगीत ऐकत नाहीत तरि जास्त गायक तिथूनच आहेत.
 • जग इतकं मोठ आहे कि अजुन हिंदुस्थानपण व्यवस्थित नाही पाहिलं.
 • अ‍ॅडमिंटनमध्ये अल्हाह गाताना अल्हाह-ओम असे शब्द आपोआप उच्चारले गेले… दुर्गा जसराज म्हणाल्या कि, अल्हाह आणि ओम एकच…
 • हैद्राबाद येथील कॅफेटेरिया हिच माझी शाळा….
 • मी श्रेष्ठ कलावंत किंवा श्रेष्ठ गुरुही नाही…
 • पुण्याने इतकं प्रेम कसं दिलं याचं आश्चर्य… पुण्याने मला सगळं काही दिलं…
 • सन्मान स्विकारल्यानंतरची भावना – ज्यांनी आईवडीलांची पुजा केली… जिवंत ठेवलं तेच खुप महान आहे… तोच मोठा पुरस्कार आहे…