राजगुरुनगर, चाकणमध्ये 17 ठिकाणी वीजचोरी, अनधिकृत वापर उघडकीस

Share this News:

पुणे, दि. 05 : महावितरणच्या वीजमीटर तपासणी मोहिमेमध्ये राजगुरुनगर व चाकण शहर व परिसरात 17 ठिकाणी विजेची चोरी व अनधिकृत वीजवापराचा प्रकार उघडकीस आला आहे.

याबाबत माहिती अशी, की राजगुरुनगर विभाग अंतर्गत चाकण, राजगुरुनगर शहर व लगतच्या परिसरात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजमीटर तपासणीची नुकतीच विशेष मोहिम घेण्यात आली. यात 8 ठिकाणी वीजचोरी आढळून तर 9 ठिकाणी विजेचा अनधिकृत वापर होत असल्याचे दिसून आले. तसेच या मोहिमेत नादुरुस्त व सदोष मीटर दिसून आले ते बदलण्यात आले. ज्या मीटरचे रिंडींग घेतले जात नव्हते अशा मीटरचे रिंडींग घेण्यात आले. यामध्ये महावितरणला 54 लाख 52 हजार रुपयांचा महसुल मिळणार आहे. वीजचोरी प्रकरणी कलम 135 तर अनधिकृत वीजवापरप्रकरणी कलम 126 अन्वये कारवाई करण्यात येत आहे.