वृक्षारोपन सप्ताहानिमित्त सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेची वृक्षदिंडी उत्साहात संपन्न
वृक्षारोपन सप्ताहानिमित्त सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेची वृक्षदिंडी उत्साहात संपन्न झाली .पुणे कॅम्पभागातील स्टेव्हली रोडवरील सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ” भव्य वृक्ष दिंडी काढून पर्यावरण जनजागृती केली . शासनाच्या वृक्षारोपन सप्ताहानिमित्त या वृक्षदिंडीचे आयोचजण केले होते . यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृती फलक धरले होते . तसेच झाडे लावा ,झाडे जगवा आणि हिरवा परिसर जीवन नव्हे एक तरी झाड लावायला हवे अशा घोषणा दिल्या . यावेळी शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले .
या वृक्ष दिंडी आयोजनासाठी सेंट मार्गारेट प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एलिझाबेथ विधाते , शिक्षिका अनुपमा कलकोटी व स्मिता भोंगे आदी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले .
