ऑल न्यू बीएमडब्ल्यू एफ 750 जीएस आणि ऑल न्यू बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस चे भारतात लॉन्च

Share this News:

बीएमडब्ल्यू मोटरॅड इंडियाने आज भारतात ऑटो एक्स्पो 2018 मध्ये ऑल न्यू बीएमडब्ल्यू एफ 750जीएस आणि ऑल न्यू बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस या गाड्यांचा लॉन्च केला. ऑल न्यू बीएमडब्ल्यू एफ 750जीएस आणि ऑल न्यू बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस कंप्लीटली बिल्ट-उप युनिटस् (CBU) उपलब्ध असतील आणि आजपासूनच बीएमडब्ल्यू मोटरॅडचे डीलरशिपमध्ये बुक करता येतील. डिलिव्हरी मे 2018 पासून सुरू होईल.

टीमो राउश,, व्हाईस प्रेसिडंट मार्केटींग आणि सेल्स, बीएमडब्ल्यू मोटोर्राड म्हणाले “दहा वर्षांहून अधिक काळापासून एफ सिरीज मधल्या जीएस मॉडेल्सनी प्रिमीअम रायडींगचा आनंद दिला आहे. यामध्ये मिड क्लास ऍडव्हेंचर सेगमेंटमधे बीएमडब्ल्यू मोटरॅडची ठराविक वैशिष्ट्ये आहेत. टूरींग आणि लॉंग डिस्टन्स क्षमता यांच्या अचूक संयोगाचे जीएस प्रतिनिधित्व करते, ज्यामध्ये स्पोर्टी डायनामिक्स आणि सर्वोच्च ऑफ रोड परफॉर्मन्सचा मिलाप आहे. आता आणखी जास्त सोपे आणि काळजीमुक्त असे अल्टीमेट रायडींग मशीन तयार करण्याच्या उद्देशाने बीएमडब्ल्यू मोटरॅडने आता त्यांच्या जीएस मॉडेल्सना संपूर्णपणे रिडिझाइन आणि रिइंजिनियर केले आहेत.”

श्री. विक्रम पावाह, प्रेसिडेंट, बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया म्हणाले, “बीएमडब्ल्यू मोटरॅडने आता त्यांच्या यशाचे सूत्र अधिक विशेष स्वरूपात दाखल केले आहे. प्रिमिअम ट्रॅव्हल एन्ड्युरोज, ऑल न्यू बीएमडब्ल्यू एफ 750 जीएस आणि ऑल न्यू बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस या गाड्या सर्वांगिण आहेत ज्या स्वारांना अगणित पर्याय देतात आणि प्रत्येक मोजमापात वरचढ ठरतात. आपल्या मशीनने विविध भूमिका पार पाडाव्यात अशी अपेक्षा असणाऱ्या भारतीय उत्साही मोटरसायकल स्वारांना ही बीएमडब्ल्यू मोटरॅडची दोन्ही उत्पादने आवडतील अशी आम्हाला खात्री आहे. व्यावहारीक हेतूने केलेल्या शहरी प्रवासासाठी, दूरवरच्या वळणदार प्रवासासाठी तसेच जेव्हा अंतर्मनातला स्वार अधिक आव्हानांसाठी आतुर होतो तेव्हाही या मोटरसायकल्स अचूक साथ देतात.”

ऑल न्यू बीएमडब्ल्यू एफ 750 जीएस हलक्या पांढऱ्या रंगासोबत काळ्या/लाल रंगाच्या आसनात उपलब्ध आहे आणि ऑस्टीन यलो रंगासोबत काळ्या/करड्या आसनात उपलब्ध आहे. याबरोबरच स्टिरिओ मेटॅलिक मॅट रंगासोबत हॅण्ड प्रोटेक्टर्स, ग्रॅनाइट ग्रे व्हील रीम्स, सिल्वर हॅण्डलबार, मोठ्या जीएस टेपसह इलेक्ट्रोप्लेटेड रॅडीएटर कव्हर आणि काळी/करडी आसने ही अतिरिक्त वैशिष्ट्ये आहेत.

ऑल न्यू बीएमडब्ल्यू एफ 850 जीएस रेसिंग रेड रंगासोबत काळ्या/करड्या रंगाच्या आसनात उपलब्ध आहे आणि रॅली स्टाइल, ज्यामध्ये हलका पांढरा रंग (सोबत रेसिंग रेड / लुपिन ब्लू मेटॅलिक टेप), हॅण्ड प्रोटेक्टर्स, व्हील रिम्स ऍनोडाइज्ड गोल्ड, मोठ्या जीएस टेपसह इलेक्ट्रोप्लेटेड रॅडीएटर कव्हर आणि काळी/करडी आसने ही वैशिष्ट्ये आहेत. पोलक्स मेटॅलिक मॅट रंगासोबत हॅण्ड प्रोटेक्टर्स, फिक्स्ड फोर्क ट्यूब्स ऍनोडाइज्ड गोल्ड, मोठ्या जीएस टेपसह इलेक्ट्रोप्लेटेड रॅडीएटर कव्हर आणि काळी/करडी आसने अशाही वैशिष्ट्यात उपलब्ध आहे.